‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा; 25 लाखांचं बक्षीस
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत लवकरच श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये मुळशीमधील अनेक उद्योजक सहभागी होणार असून जानकी - ऋषिकेश, ऐश्वर्या - सारंग आणि अवंतिका - सौमित्र देखील सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या जोडीला 25 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुळशीमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्री आणि सौ स्पर्धेत वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. मात्र ते टास्क कोणते असतील याची कल्पना मात्र ऐनवेळी देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा नक्कीच आव्हानात्मक असेल. पहिली फेरी पाककला स्पर्धा असणार आहे. जानकी सुगरण आहेच, मात्र ही फेरी जानकी जिंकू नये म्हणून ऐश्वर्याने पूर्ण बंदोबस्त केला आहे. त्यामुळे श्री आणि सौ स्पर्धेची पहिली फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List