Mamta Kulkarni : न्यूड फोटोंची ब्लॅकने विक्री, अंडरवर्ल्ड ते साध्वी; ममता कुलकर्णीची थक्क करणारी गोष्ट!

Mamta Kulkarni : न्यूड फोटोंची ब्लॅकने विक्री, अंडरवर्ल्ड ते साध्वी; ममता कुलकर्णीची थक्क करणारी गोष्ट!

एकेकाळी आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. आजही तुला ‘राणा जी माफ करना’ या गाण्यामुळे ओळखले जाते. क्रांतीवीरमधील तिची भूमिकाही गाजली होती. ममता कुलकर्णीचं वैयक्तिक आयुष्य तसं वादळीच राहिलं आहे. सिनेमा, टॉपलेस फोटोशूट, ड्रग्स ते अंडरवर्ल्ड असा तिचा प्रवास राहिला आहे. आता या प्रवासात आणखी एक गोष्ट सोडली गेली आहे. ती म्हणजे संन्यास. ममता कुलकर्णीने संन्यास घेतला आहे. ती साध्वी बनली आहे. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होणार आहे. ममता नंद गिरी या नावाने ती ओळखली जाणार आहे. ममताचा हा जीवन प्रवास कसा राहिला आहे? त्याचाच घेतलेला हा आढावा.

ममता कुलकर्णीचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत झाला होता. 1992मध्ये आलेल्या तिरंगा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यांनंतर तिने ‘आशिक’, ‘आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ आणि ‘करण अर्जुन’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देऊन ममता कुलकर्णी यशस्वी अभिनेत्री झाली होती. पण त्याच काळात तिचं करिअर धोक्यात आलं. ती वादांची शिकार झाली होती.

15 हजाराचा दंड

1993मध्ये तिने स्टारडस्ट मॅगझिनला टॉपलेस फोटो दिले होते. 90च्या दशकात इतका बोल्ड फोटोशूट करणं तिच्या अंगलट आलं होतं. तिच्या फोटोवरून देशात गहजब माजला होता. ममताचे हे न्यूड फोटो ब्लॅकने विकले जात होते. पण हेच बोल्ड फोटोशूट केल्यामुळे ममताला 15 हजाराचा दंड भरावा लागला होता. ममताच्या या फोटोवरून इतकं वादंग उठलं की लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. ममताला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.

‘चायना गेट’मधून बाहेर आणि आत

केवळ टॉपलेस फोटोशूटमुळेच नाही तर अंडरवर्ल्ड डॉनसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळेही ममता चर्चेत आली होती. राजकुमार संतोषी यांच्या ‘चायना गेट’ या सिनेमाचं अर्ध चित्रीकरण झाल्यावर ममताला सिनेमातून काढून टाकलं होतं. पण अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला जेव्हा ही खबर लागली तेव्हा त्याच्या इशाऱ्यावरून ममताची या सिनेमात वापसी झाली होती.

केन्यात अटक

अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधामुळे ममता बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्याचं सांगितलं जातं. डॉन आणि ममताच्या रिलेशनशीपची चर्चा इंडस्ट्रीत आगीसारखी पसरली. पण तिने या अफवा असल्याचं सांगून नेहमी वेळ मारून नेली. पण 2000 मध्ये तिने ड्रग्स माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 2016मध्ये ममता आणि विक्कीला पोलिसांनी ड्रग्स तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती. केन्या एअरपोर्टवर दोघांना अटक केली होती. पण आपल्याविरोधातील हे षडयंत्र असल्याचं ममता कुलकर्णीने सांगितलं आणि त्यानंतर तिला सोडून देण्यात आलं.

सिनेमात काम करायचंच नव्हतं

लग्नापूर्वीच ममताने हळूहळू सिनेमात काम करणं कमी केलं. 1999मध्ये तिने बॉलिवूडमधून संन्यास घेतला. लग्नानंतर ती चर्चेत राहिली नाही. 2014मध्ये ममता तिची आत्मकथा ‘ऑटोबायोग्राफी बाय योगिनी’मुळे परत चर्चेत आली. पुस्तक प्रकाशित करताना तिने तिच्याबाबतचे अनेक खुलासे केले. मला सिनेमात कधीच यायचं नव्हतं. आईच्या आग्रहाखातर आपण सिनेमात आलो. सिनेमात येणं ही आपली सर्वात मोठी घोडचूक होती, असं सांगतानाच सिनेमापासून दूर गेल्यानंतर मी अध्यात्माच्या मार्गावर गेले. आता ती साध्वी म्हणून आयुष्य जगत आहे. आता तर तिला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर करण्यात आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी खेळाडूविना आयसीसीचा सर्वोत्तम वन डे संघ हिंदुस्थानी खेळाडूविना आयसीसीचा सर्वोत्तम वन डे संघ
आयसीसीने ‘सर्वोत्तम एकदिवसीय संघा’ची घोषणा करताना हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयसीसीने 2024 या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा...
अर्थवृत्त – शेअर बाजारात चढ-उतार
सेलिबी नास कंपनीच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश
बीड, परभणीतील हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा
दृष्टिहीनांच्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम
शिवसेनेच्या वतीने दिंडोशीत सामाजिक उपक्रम