बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या…
विख्यात दिग्दर्शक प्रीतीश नंदी यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी 8 जानेवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेकजण दु:खात असून कित्येक लोकांनी शोक व्यक्त केला. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची माहिती देणारी एक दीर्घ पोस्ट शेअर केली होती. चित्रपट निर्माते तसेच कवी, लेखक आणि पत्रकार असलेल्या प्रितिश नंदी यांच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटी दु:खी झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे अनुभव शेअर करत प्रीतीश नंदी यांना श्रद्धांजली वाहिली. पण ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक अथवा दु:ख व्यक्त करण्यास नकार दिला. नो RIP असं लिहिताना त्यांनी केवळ शिवीच दिली नाही तर त्यामागची संपूर्ण कहाणीही त्यांनी सांगितली.
अभिनेते अनुपम खेर यांनी प्रितीश नंदी यांच्या निधनाची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आणि त्यांना आपला चांगला मित्र म्हटले. मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांत, ते माझ्यासाठी एक सपोर्ट सिस्टम आणि शक्तीचा एक मोठा स्रोत होता, असे अनुपम खेर यांनी नमूद केलं. पण नीना गुप्ता यांनी अनुपम खेर यांच्या या पोस्टवर कमेंट केली आणि प्रीतीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यास साफ नकार दिला.
मात्र नंतर नीना गुप्ता यांनी त्यांची कमेंट डिलीट केली हे, पण ज्या कारणामुळे त्यांनी हे सगळं लिहीलं ती गोष्ट आता व्हायरल झाली आहे.
प्रीतीश नंदींवर लावले चोरीचे आरोप
नीना गुप्ता यांनी अनुपम खेर यांच्या पोस्टवर जी कमेट केली, त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी प्रीतीश नंदींवर चोरीचा आरोप केला. ‘तुम्हाला माहित आहे का त्याने माझ्यासोबत काय केले? आणि मी त्याला उघडपणे बास्टर्ड म्हटले. त्याने माझ्या बाळाचा जन्म दाखला चोरून प्रकाशित केला होता.” असे नीना गुप्ता यांनी म्हटलं होतं. त्यांनी दुसरी कमेंट केली आणि त्यात लिहीलं – ‘ काही RIP वगैरे नाही, हे तुम्हाला समजलं का ? माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत.’ असेही त्यांनी लिहीलं होतं.
काय होतं प्रकरण ?
एका जुन्या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी या घटनेचा उल्लेख केला होता. नीना गुप्ता या प्रितीश नंदी यांच्यावर रागावण्याचे कारण म्हणजे लग्नापूर्वीची त्यांची गर्भधारणा. नीना या लग्नाआधीच गरोदर राहिली होती आणि प्रितिश नंदीने मसाबाचा जन्म दाखलाही पळवला होता आणि तो छापला होता. त्यानंतर हे समोर आले की, मसाबाचे वडील वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आहेत. मसाबा ही विव्हियन रिचर्ड यांची मुलगी आहे, हे मला जगाला सांगायचं नव्हतं, पण त्या आर्टिकल नंतर ते बॉलिवूडचं सगळ्यात मोठं गॉसिप झालं ,असं नीना यांनी नमूद केलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List