“आपल्याला कोणी गॉडफादर नाही, फक्त या तीन गोष्टीच…”  एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

“आपल्याला कोणी गॉडफादर नाही, फक्त या तीन गोष्टीच…”  एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

Eknath Shinde Godfather Statement : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडला. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थितीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्याला कोणी गॉडफादर नाही असा उल्लेख केला. त्यासोबत त्यांनी फक्त या तीन गोष्टीच आपला गॉडफादर असल्याचे म्हटले आहे.

“हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो”

“आतापर्यंतच्या इतिहासात असा विजय कधी मिळाला नव्हता. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागेल. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तो हक्क कायम राहील. हे वचन देतोठ, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

खुर्चीची लालसा कुणाला आहे?

मी काम करत होतो. माझ्यासोबत तुम्ही रात्रीचा दिवस करून काम केलं. पायाला भिंगरी लावून आपण काम केलं हा मी माझा विजय समजतो. लँडस्लाईड मँडेड विजय आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असा विजय कधी मिळाला नव्हता. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागेल. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तो हक्क कायम राहील. हे वचन देतो. मी साधा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही आहे. आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे कधी कासावीस झाला नाही. होणार नाही. आई भवानीच्या आशीर्वादाने सर्व काही मिळालं. मुख्यमंत्रीपद मिळालं. जनतेची सेवा करता आली. जनतेच्या आयुष्यात बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी करण्याची संधी मिळाली. राज्यातील बहिणींचा दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ, लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली. ही पदापेक्षा मोठी आहे. खुर्चीची लालसा कुणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

“हेच आपले गॉडफादर आहे”

“तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल. सर्व पदे मिळतील. सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापी विसरू नका. ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं. महापौर, नगरसेवक, मंत्री, मुख्यमंत्री झाले. हा शिवसैनिक आपल्याला मोठं करतो. तो लोकात जातो. आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. पण जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. शिवसैनिकाला अडचणीत मदत करा, तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील असं बाळासाहेब म्हणायचे. आपण शिवसेना वाढवण्याचं आणि घडवण्याचं काम केलं. आपल्याला कोणी गॉडफादर नाही, शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे यांचे विचार हेच आपले गॉडफादर आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे”

“बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली. धनुष्यबाण आपल्याकडे आलं. शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलं. म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेने त्यांचा नक्शा उतरवून टाकला. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सबालेंकाची फायनल हॅटट्रिक, जेतेपदाच्या लढतीत मॅडिसन किजचे आव्हान सबालेंकाची फायनल हॅटट्रिक, जेतेपदाच्या लढतीत मॅडिसन किजचे आव्हान
गतविजेत्या एरिना सबालेंकाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली असून जेतेपदाच्या हॅटट्रिकपासून ती केवळ एक पाऊल...
कामाठीपुऱ्यात बांगलादेशी ‘लाडकी बहीण’, क्राइम ब्रँचकडून पाच जणांना अटक
बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक
छत्तीसगडमध्ये 50 किलो आयईडी स्फोटके निकामी
शाळेत बॉम्बची धमकी 
अंधेरीत शिवसेनेचा भगवा झंझावात, परिसरात झेंड्यांची शोभा, भगवी वस्त्रे, टोप्या, साड्या
गँगस्टर डी. के. रावसह सात जणांना अटक