हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे थेट चॅलेंज
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा अंधेरी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात उद्धव ठाकरे यांचा सर्व रोख भाजपाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच होता. आम्ही कधीच ९२-९३ च्या दंगलीची माफी मागितली नाही, परंतू मीडियाला हाताशी धरुन यांनी हे छापून आणल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. त्यानंतर त्यांनी भाजपाला चॅलेंजच दिले की भाजपाने हिंमत असेल तर त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा असे चॅलेंजच ठाकरे यांनी यावेळी दिले.
त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी आणि आडवाणी मात्र बाबरी नंतर झालेल्या दंगलीनंतर माफी मागत होते. “इट वाज टेरिबल मिस्टेक” असं आडवाणी म्हणाले होते असा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. अमित शाह यांनी आडवाणी आहेत अजून त्यांना जाऊन विचारावे. नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरे यांनी नव्हे मोदींनी खाल्ला होता अशी आठवणी ठाकरे यांनी काढली होती. आमच्या बाजूला मुस्लिम राहायचे, ते ताजिया द्यायचे. मी खायचो, असं मी नाही मोदी म्हणाले होते. टोप्या घातलेले तुमचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत आणि वर तुम्ही मी हिंदूत्व सोडलं म्हणता. देशाच्या तिरंग्यात हिरवा आहे. तो तिरंगा स्वातंत्र्यानंतरही तुमच्याकडे फडकवत नव्हते. उलट आमच्या भगव्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
“तुमची सालटी खूप काढता येईल”
आम्ही जी पहिली पोटनिवडणूक लढवली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढली होती. हिंदू जरी असला आणि कुरुलकर सारखा पाक धार्जिणा असेल तरी तो आमचा नाहीच… आम्ही ९७ ची निवडणूक लढवल्यानंतर महाजन वगैरे आले. तेव्हा मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे. हे भाजप आणि संघवाले असेच आहेत. काड्या लावायच्या, पेटवायचे आणि बाजूला व्हायचे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. बाबरीवरून वातावरण तापवले आणि बाबरी पडल्यावर आम्ही नाही केलं असं म्हणून नामानिराळे राहिले. हे तुमचं हिंदुत्व. हा तुमचा नामर्दपणा असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List