शिर्डी दर्ग्याचा वाद : आपली विचारसरणी बदलली का ? राष्ट्रवादीच्या आमदाराला मुस्लीम संस्थेचा सवाल

शिर्डी दर्ग्याचा वाद : आपली विचारसरणी बदलली का ? राष्ट्रवादीच्या आमदाराला मुस्लीम संस्थेचा सवाल

शिर्डीतील साई मंदिरातील मजारचा वाद वाढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिर्डीत येऊन या संदर्भात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे सलीम सारंग यांनी राष्ट्रवादी अजित गटाचे आमदार संग्राम जगताप यांना खरमरीत पत्र लिहीले असून स्थानिक वादात बाहेरच्या आमदारांनी येऊन नाक खुपसू नये असा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी या शिर्डीच्या साई मंदिरासमोरील मजार आणि दर्ग्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यानंतर आता मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने त्यांना पत्र लिहून जाणीव पूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे म्हटले आहे. शिर्डी संस्थान आणि स्थानिक नागरिक हाजी अब्दुल बाबा दर्ग्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, आपण जाणीवपूर्वक वाद निर्माण होईल अशा कृती करू नका असे आवाहन मुस्लिम विल्फेअर असोसिएशनचे प्रमुख सलीम सारंग यांनी केले आहे. या संदर्भात जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची पूर्णपणे जबाबदारी संग्राम जगताप यांची असेल असा इशारा देखील सलीम सारंग यांनी दिला आहे.

विचारधारेपासून दूर जात आहात

मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन आपल्या निदर्शनास आम्ही काही महत्त्वाचे मुद्दे आणून देऊ इच्छित आहे. शिर्डी येथील साई मंदिरासमोरील मज़ार प्रकरणात आपण केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे समाजात फूट पाडण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहात. जो शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर आधारलेला आहे. मात्र आपल्या कृती आणि विधानांमुळे असे दिसते की आपण या विचारधारेपासून दूर जात आहात. आणि विचारधारेला हरताळ फासण्याच काम करीत आहात.

शिर्डीतील मजाराचा मुद्दा स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्रितरीत्या समजूतीने आणि शांततेत सोडवावा हीच आमची अपेक्षा आहे. मात्र आपण बाहेरच्या मतदारसंघातून शिर्डीमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम वाद उभा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. हे वर्तन आपल्या पदाला शोभणारे नाही. ना पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत आहे असेही सलीम सारंग यांनी पत्रात म्हटले आहे.

आपली विचारसरणी बदलली आहे का?

आपण आपल्या मतदारसंघात अशाच प्रकारे पक्षाच्या विचारधारेच्या विरोधातली भूमिका घेता आणि धार्मिक तेढ निर्माण करीत असता असे सातत्याने निदर्शनास येत आहे. लोकांनी तुम्हाला त्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी निवडून दिले आहे. धार्मिक वाद वाढवण्यासाठी नक्कीच नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करता, ज्याचा पाया सर्वधर्मसमभाव म्हणजेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे. त्यामुळे आपल्या सध्याच्या वागण्यावरून आपण आपली विचारसरणी बदलली आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो असा टोला या पत्रात सलीम सारंग यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं
उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा समाचार...
‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
प्रेमाने वागाल तर उचलून देऊन, कपटाने वागाल तर… तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?; ठाकरेंचा अमित शाह यांना सवाल
उद्धव ठाकरेंकडून ‘एकला चलो रे’चा नारा, नेमकं काय म्हणाले?
एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं उघड चॅलेंज
रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे