Delhi Assembly election – अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर मांडल्या ‘या’ 7 मागण्या, वाचा सविस्तर…

Delhi Assembly election – अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर मांडल्या ‘या’ 7 मागण्या, वाचा सविस्तर…

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी त्यांच्या पक्षाचा ‘मध्यमवर्गीय जाहीरनामा’ (Manifesto for Middle Class) प्रसिद्ध केला आहे. यात आप पक्षाने केंद्राकडे शिक्षण, आरोग्य, करत सूट आणि पेन्शनशी संबंधित सात मागण्या मांडल्या आहेत. 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा मध्यमवर्गीयांसाठी समर्पित असावा, अशीही मागणी केजरीवाल यांनी केली. आज एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या मागण्या मांडल्या आहेत.

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले के, “आम्ही केंद्र सरकारला आवाहन करतो की, त्यांनी हिंदुस्थानची खरी महासत्ता म्हणजेच मध्यमवर्गीयांकडे लक्ष द्यावं. मी जाहीर करतो की, रस्त्यापासून संसदेपर्यंत आम आदमी पक्ष मध्यमवर्गीयांचा आवाज बुलंद करणार. पुढील केंद्रीय अर्थसंकल्प मध्यमवर्गाला समर्पित करावा, अशी आमची मागणी आहे.”

अरविंद केजरीवाल म्हणाले, “आज मी केंद्र सरकारकडे सात मागण्या करत आहे सर्वातआधी शिक्षणाचे बजेट 2 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवावे आणि खासगी शाळांच्या फीवर मर्यादा घालावी. दुसरे म्हणजे उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि शिष्यवृत्ती द्यावी. तिसरे, आरोग्य बजेट वाढवून ते 10 टक्के करावे आणि आरोग्य विम्यावरील कर हटवावा.”

केजरीवाल पुढे म्हणाले, “चौथे, आयकर सवलत मर्यादा सध्याच्या 7 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवावी. पाचवं, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी काढून टाकण्यात यावा.” ते म्हणाले, “सहावे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मजबूत सेवानिवृत्ती योजना आणि पेन्शन योजना जाहीर केली जावी, तसेच देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा असावी. सातवे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत मिळायला हवी.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पेडल अन् स्पोक व्हीलही नाही, ‘ही’ इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर धावते 100 किमी; किती आहे किंमत? पेडल अन् स्पोक व्हीलही नाही, ‘ही’ इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर धावते 100 किमी; किती आहे किंमत?
ऑटो एक्स्पो 2025 यावेळी सर्वात जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शित होत आहेत. यात अनेक नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसत...
देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू, एका चार्जमध्ये धावते 250km; जाणून घ्या किंमत
India vs England T20 – टीम इंडियाने अवघ्या 13 षटकात इंग्लंडला चारली धूळ; मालिकेत 1-0 अशी आघाडी
महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर…
घरातील कार्यक्रमात दारू पिऊन धिंगाणा घातल्याने भावानेच दिली भावाच्या हत्येची सुपारी
Delhi Assembly election – अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर मांडल्या ‘या’ 7 मागण्या, वाचा सविस्तर…
Jalgaon Tragedy – मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा