Video हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा… दमदार डायलॉग, भव्य सेट… पाहा ‘छावा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
मौत के घुंघुरु पहन कें नाचते हैं हम औरंग… हमारी मौत हर घर में एक शिवा और सांभा पैदा करेगी… रक्ताने माखलेल्या शरीराने जेव्हा संभाजीराज्यांच्या भूमिकेतील विकी कौशल हा डायलॉग म्हणतो तेव्हा अक्षरश: अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा डायलॉग आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा या चित्रपटातील. छावा या चित्रपटाचा आज ट्रेलर रिलीज करण्यात आला.
या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. तर रश्मिका मंधानाने महाराणी येसूबाई आणि अभिनेता अक्षय खन्नाने औरंगझेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ट्रेलर लाँच आधी विकीने सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List