Jalgaon Train Accident – जळगाव येथील अपघात दुर्दैवी, आदित्य ठाकरे यांची मृतांना श्रद्धांजली
जळगाव जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात झाल्याची घटना घडली आहे. परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनबाहेर उद्या मारल्या. यातच समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने काही प्रवाशांना चिरडल.
या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मिळत आहे. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हा अपघात दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, ”जळगाव येथे परधाडे स्टेशनजवळ मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघाताची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. एक्स्प्रेसला आग लागल्याचा समज झाल्याने प्रवाशांनी भीतीने एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या आणि हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी प्रवाशांना लवकरात लवकर योग्य उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.”
जळगाव येथे परधाडे स्टेशनजवळ मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघाताची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. एक्स्प्रेसला आग लागल्याचा समज झाल्याने प्रवाशांनी भीतीने एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या आणि हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List