India vs England T20 – टीम इंडियाने अवघ्या 13 षटकात इंग्लंडला चारली धूळ; मालिकेत 1-0 अशी आघाडी

India vs England T20 – टीम इंडियाने अवघ्या 13 षटकात इंग्लंडला चारली धूळ; मालिकेत 1-0 अशी आघाडी

कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड असा टी -20 सामना बुधवारी झाला. या सामन्यात टीम इंडियाने 7 गडी अन् 43 चेंडू राखत जबरदस्त विजय मिळवला आहे. अवघ्या 13 षटकात टीम इंडियाने इंग्लंड संघाला धूळ चारली आहे. नाणेफेक जिंरत टीम इंडियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाडी करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. विजयासाठी टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य होते.

टीम इंडिया फलंदाजीसाठी आल्यावर सलामीवीर अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान सहज पार केले. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंग याने संघाला चांगली सुरुवात करत इंग्लंड संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात दोन गडी बाद करत इंग्लंडला डाव कमकुवत केला. उप कर्णधार अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलरने 44 चेंडूत 68 धावा केला. त्याचा अपवाद वगळता अन्य कुणालाही चांगला खेळ करता आला नाही. इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या होत्या.

टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरताच इंग्लंडने दिलेले 133 धावांचे लक्ष्य फक्त 12.5 षटकांत पूर्ण केले. या विजयाचे नायक अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती ठरले. अभिषेकने फक्त 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने 6 षटकार आणि 3 चौकार मारले. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 12.5 षटकांत 7 गडी राखत सामना जिंकला आहे. अशाप्रकारे टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan Attacked : वांद्रे तलावात दीड तास शोधाशोध, अखेर चाकूचा तुकडा सापडला Saif Ali Khan Attacked : वांद्रे तलावात दीड तास शोधाशोध, अखेर चाकूचा तुकडा सापडला
बॉलिवूडचा नवाब, अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. आता घटना कशी घडली याची माहिती पोलीस...
गुगलच्या दमदार फोनवर मिळत आहे 26 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
पेडल अन् स्पोक व्हीलही नाही, ‘ही’ इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर धावते 100 किमी; किती आहे किंमत?
देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू, एका चार्जमध्ये धावते 250km; जाणून घ्या किंमत
India vs England T20 – टीम इंडियाने अवघ्या 13 षटकात इंग्लंडला चारली धूळ; मालिकेत 1-0 अशी आघाडी
महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर…
घरातील कार्यक्रमात दारू पिऊन धिंगाणा घातल्याने भावानेच दिली भावाच्या हत्येची सुपारी