ना पापाराझी, ना फॅन्स, कोणालाही सैफजवळ जाता येणार नाही; मुंबई पोलिसांकडून तगडी सुरक्षा
याआधी सैफ अली खानला मुंबई पोलिसांची सुरक्षा कधीही नव्हती. मात्र आता या हल्ल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली आहे.
याआधी सैफ अली खानला मुंबई पोलिसांची सुरक्षा कधीही नव्हती. मात्र आता या हल्ल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सैफ अली खानने त्याची सुरक्षा टीम बदलल्याचीही बातमी आहे. आता त्याच्या सुरक्षेची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयच्या हाती असणार आहे. सैफ अली खाननेही त्याला हे काम दिले असल्याचे बोलले जात आहे.
रोनित रॉय ‘एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन’ नावाची संस्था चालवतो ज्यामध्ये तो सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम करतो. त्यामुळे आता सैफसाठीचे सुरक्षा रक्षक तोच देणार आहे. रोनित रॉयचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये तो म्हणतो, ‘आम्ही सैफसोबत आधीपासूनच आहोत. तो आता ठीक आहे आणि परत आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List