विवाहित असून पार्टनरपासून वेगळे राहतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी
गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की ती गोविंदासोबत एकाच घरात राहत नाही. हे दोघं वेगवेगळ्या घरात राहतात. "आमची दोन घरं आहेत. त्यापैकी एक अपार्टमेंट आणि एक बंगला आहे. अपार्टमेंटमध्ये मी आणि माझी मुलं राहतो, तर समोरच्या बंगल्यात गोविंदा एकटाच राहतो", असं तिने सांगितलं.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत. अशातच ऐश्वर्या अभिषेकसोबत 'जलसा' या बंगल्यात राहत नसल्याचं वृत्त आहे. मुलगी आराध्यासोबत ती वेगळ्या घरात राहत असल्याचं कळतंय.
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्यात खूप भांडणं व्हायची. त्यामुळे दोघंही वेगवेगळ्या घरात राहायचे. 'टाइम्स नाऊ'ने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं. एका मुलाखतीत रणबीर कपूरसुद्धा आईवडिलांच्या भांडणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List