भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्याच्या मुलीचे सौंदर्य अन् संपत्ती पुढे स्टार किड्सही फेल; लहान वयातच संपत्तीचा आकडा करोडोंच्या घरात
आजकाल स्टारकिड्सची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. तसेत अनेकजण मोठ्या प्रोजेक्टसह बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. या सर्वच स्टारकिड्सबद्दल प्रेक्षकांची समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळते. जसं की नुकतीच रवीना टंडनची लेक राशा एका मोठ्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. अॅक्टींसह तिच्या सौंदर्याचंही तेवढच कौतुक होताना दिसत आहे.
पण अशीही एक सौंदर्यवती आहे जिचे वडील हे भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माते मानले जातात. जेव्हा तिचे फोटो व्हायरल झाले तेव्हा मात्र हे सर्व स्टार किड्स तिच्यासमोर फेल असल्याचं म्हटलं गेलं. एवढच नाही तर ही मुलगी 32 व्या वर्षी करोडो कमावतेय. तिची नेटवर्थही शाहरूखपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.
बिझनेस टायकून आणि फिल्ममेकर कलानिधि मारन यांची मुलगी
ही सौंदर्यवती आहे काव्या मारन. जी बिझनेस टायकून आणि फिल्ममेकर कलानिधि मारन यांची मुलगी आहे. ती आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकही आहे. कलानिधि मारन यांनी करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियादवाला आणि रॉनी स्क्रूवाला यांसारख्या प्रसिद्ध लोकांनाही मागे टाकलं आहे आणि त्यांना भारताचे बिल गेट्स म्हटलं जातं. तर मुलगीही वयाच्या 32 व्या वर्षी करोडो कमावतेय.
कलानिधि मारन भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30,289 कोटी रुपये आहे. तसेच ते सन ग्रुपचे चेअरमनही आहेत. त्यांची पत्नी कावेरी मारन या सोलर टीव्ही कम्युनिटीच्या सीईओ आहेत.
यशस्वी बिझनेसवुमन
त्याच वेळी त्यांची मुलगी काव्या मारनची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. तिचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नई येथे झाला होता. ती आता 32 वर्षांची एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. काव्या मारनने लहान वयात खूप काही साध्य केलं आहे.
काव्या मारनने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली आहे आणि वारविक बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. ती तिच्या वडिलांसोबत आयपीएल संघाची को-ओनर आहे. तसेच ती 2018 पासून फ्रँचायझीची सीईओ देखील आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच काव्या करोडोंची कमाई करत आहे.
काव्या चित्रपटांपासून दूर असली तरी खूप सुंदर
सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्याची मुलगी काव्या मारन दिसायलाही खूप सुंदर आहे. तिला पाहिल्यानंतर ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मात्र ती यासर्वांपासून दूरच राहते. तिला बिझनेसमध्ये फार रस असल्याचं दिसून येतं.
कलानिधी यांचे चित्रपट
कलानिथी मारन SUN ग्रुपचे मालक आहेत, जे 37 टीव्ही चॅनेल तसेच सन पिक्चर्स फिल्म मेकिंग कंपनी नियंत्रित करते. आणि सन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘एंथिरन’, ‘पेट्टा’, ‘बीस्ट’, ‘जेलर’ आणि ‘रायन’ सारखे चित्रपट बनले आहेत. रजनीकांत आणि धनुष यांसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. ‘जेलर’ चित्रपटाच्या यशानंतर कलानिधी मारन यांनी रजनीकांत यांना बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती.
कलानिधी मारन यांनी संपत्तीच्या बाबतीत शाहरुखलाही मागे टाकलं
कलानिधी मारन यांची संपत्ती बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खानपेक्षाही जास्त आहे. फोर्ब्सनुसार, 2024 मध्ये शाहरुख खानची एकूण संपत्ती सुमारे 7300 कोटी रुपये आहे. याहीपेक्षा दुप्पट संपत्ती मारन यांची आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List