Weather update : आयएमडीचा पुन्हा हायअलर्ट; दिला धोक्याचा इशारा, हवामानाबाबत मोठी अपडेट

Weather update : आयएमडीचा पुन्हा हायअलर्ट; दिला धोक्याचा इशारा, हवामानाबाबत मोठी अपडेट

वातावरणात सतत बदल होत आहे. अचानक थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तपमानात अचानक वाढ होते. अशा वातावरणामुळे सध्या आजारांचं प्रमाण देखील वाढलं आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार येत्या 24 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच थंडीच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 36 तासांमध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

थंडींचा कडाका वाढणार

हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस जम्मू काश्मीर आणि परिसरातच होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इतर राज्यात मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. थंडी वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये, महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण  

दरम्यान जर राज्यात थंडीचा कडाका वाढला तर वाढणारी थंडी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असणार आहे. पाऊस झाल्यास याचा मोठा फटका हा या पिकांना बसला असता, मात्र थंडीत वाढ होणार असल्यानं ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. थंडीचा कडाका वाढल्यास रब्बी हंगामातील पिकांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bigg Boss 18 Winner LIVE: इजिप्तमध्ये लग्न, ख्रिश्चन असताना इस्लाम धर्म स्वीकारला; कलर्सचा प्रिय विवियन डिसेना विजेता? Bigg Boss 18 Winner LIVE: इजिप्तमध्ये लग्न, ख्रिश्चन असताना इस्लाम धर्म स्वीकारला; कलर्सचा प्रिय विवियन डिसेना विजेता?
जेव्हापासून सलमान खानचा शो ‘बिग बॉस 18’ सुरू झाला, तेव्हापासून विवियन डिसेना हा ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू...
Bigg Boss 18: काम्याने फिनालेच्या आधीच ‘या’ स्पर्धकाला ठरवलं विजेता; कोण आहे तो?
Bigg Boss 18 Winner LIVE: 3 गर्लफ्रेंड, बिग बॉस 18 शोमध्ये ईशासोबत रोमान्स; कोण आहे कंटेस्टेंट्स अविनाश मिश्रा?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर शिवसैनीकांचा शिवसेना भवनात दणदणीत निर्धार मेळावा
नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला, लग्नाचे फोटो केले शेअर
Kho-Kho World Cup 2025: महिलांनंतर पुरुषांनीही मारली बाजी, हिंदुस्थानचा दुहेरी सुवर्ण इतिहास; नेपाळला हरवून विश्वविजेतेपद पटकावले!