बिग बॉस 18 च्या ट्रॉफीची सर्वत्र चर्चा;काय खास आहे या ट्रॉफीमध्ये? सिद्धार्थ शुक्लासोबत लावलं जातंय कनेक्शन
Bigg Boss 18: लोकप्रिय शो ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या सीझनचा विजेता सलमान खान घोषित करणार आहे. प्रेक्षकांना जियो सिनेमा आणि जियो टीव्हीवरही लाइव्ह एपिसोड पाहता येणार आहे.
दरम्यान बिग बॉस 18 चा विजेता कोण असणार याबद्दल तर सर्वांना आतुरता आहेच पण प्रेक्षकांना आतुरता ही बिग बॉस 18 च्या ट्रॉफीचीसुद्धा आहे. या सिझनची ट्रॉफी नक्की कशी असणार याबद्दल नक्कीच प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे.
प्रेक्षकांची ही प्रतिक्षा आता संपली असून निर्मात्यांनी शोच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवली आहे. चला तर मग जाणून घेऊयात की यंदाच्या सीझनची ट्रॉफी नक्की असणार तरी कशी?
कशी असणार यंदाची ट्रॉफी
सलमान खानने अलीकडेच बिग बॉस 18 च्या ट्रॉफीचा खुलासा केला आणि ही ट्रॉफी पाहिल्यानंतर अनेकांना सिद्धार्थ शुक्लाच्या बिग बॉस 13 च्या सीझनची आठवण होईल.
वास्तविक, सिद्धार्थ शुक्लाची ट्रॉफी देखील बिग बॉस 18 प्रमाणेच डिझाइन करण्यात आली होती. बिग बॉसच्या गेल्या 18 सीझनमधील ट्रॉफी आणि त्यांची रचना कशी बदलली आहे ते जाणून घेऊया.
बिग बॉस 18 ची ट्रॉफी
बिग बॉस 18 ची ट्रॉफी ही सीझन 17 पेक्षा खूप वेगळी आहे. यंदाची ट्रॉफी मोठी आणि सुंदर दिसत आहे. सीझन 18 ची ट्रॉफी अधिक उठावदार आणि चकचकीत अशी दिसते आहे. ज्यावर दोन मोठे ‘बी; चिन्हे बनवले आहेत आणि त्यांच्याखाली ‘विनर बिग बॉस 18’ असे लिहिले आहे.
ही ट्रॉफी अनेकांना सिद्धार्थ शुक्लाच्या बिग बॉस 13 च्या सीझनसारखीच वाटतेय. पण तरीही यंदाची ट्रॉफी ही नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या ट्रॉफीसाठी नक्की कोण पात्र आहे हे महाअंतिम फेरीतच कळेल. सध्या, चाहते बिग बॉस 18 च्या विजेत्याच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
19 जानेवारी 2025 (आज) होणार ग्रँड फिनाले
सलमान खानच्या शो बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारी 2025 रोजी रात्री 9:30 वाजता होणार आहे. 105 दिवसांनंतर या शोचा विजेता आज घोषित होणार आहे. ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करणार असून त्यात आमिर खान आणि अक्षय कुमारसारखे सेलिब्रिटीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सिझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यापैकी आता फक्त सहाच स्पर्धक घरात राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि रजत दलाल यांपैकी कोण अव्वल पाचमध्ये पोहोचणार आणि ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List