मोठी बातमी! सैफवरील हल्ला आंतरराष्ट्रीय कट? पोलिसांच्या दाव्यानं खळबळ
मोठी बातमी समोर आली आहे, अखेर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदम्यान पोलिसांकडून आरोपीबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. सैफ अली खानवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या या दाव्यानं खळबळ उडाली आहे. दुसरीकडे न्यायाधिशांनी देखील सुनावणीदरम्यान अशीच टिप्पनी केली आहे. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट रचल्याचा संशय आहे असं म्हटलं आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. अखेर या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून बांद्रातील हाॅलीडे कोर्टात हजर केलं. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचं वकीलपत्र घेण्यासाठी वकिलांमध्ये रस्सखेच पाहायला मिळाली. दोन वकील स्वत:हून पुढे आले न्यायालयानं दोन्ही वकिलांना आरोपीची बाजू मांडण्याची परवानगी दिली. युक्तिवादाच्या वेळी सैफ अली खानवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो असा दावा पोलिसांनी केला, तर न्यायालयानं देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे.
दोन्ही बाजुनं जोरदार युक्तिवाद झाला. सुनावणीदरम्यान पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देताना न्यायालयात म्हटलं की, आरोपी भारतात अवैधरित्या वास्तव्य करत आहे. त्याने सैफ अली खान यांच्या घरात प्रवेश करून तिघांना जखमी केलेलं आहे. इथे त्याला कोणी मतद केली आहे का? आरोपीकडे एक चाकू आहे तो शोधायचा आहे, तसेच त्याने बदललेले कपडे लपून ठेवले आहेत, ते पण शोधायचे आहेत. त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. तर येथे अभिनेत्याच्या घरी हा प्रकार झाला म्हणून आज हे प्रकरण मीडियाने उचलून धरले आहे. याच जागी एखाद्या सामांन्याच्या घरी हा प्रकार घडला असता तर त्याला तेवढं महत्व प्राप्त झाल नसतं, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची कोठडी सुनावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List