Nitesh Rane : मातोश्रीने ‘त्या’ सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप, बांगलादेशीविरोधात राबवणार आक्रमक मोहीम
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशातील असल्याचे समोर आल्याने आता राज्यात संतापाची लाट उसळली. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्दावरून द्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यावेळी बांगलादेशी घुसखोरांना इशारा दिला. बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहिम राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मातोश्रीने हिरव्या सापांना दूध पाजले
यावेळी नितेश राणे यांनी मातोश्रीवर जोरदार प्रहार केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी, स्वतःच्या भावाला निवडून आणण्यासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं मतदान मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी मातोश्रीवर केला. इतक्या वर्षापासून उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. पण त्यांनी काहीच केले नाही. उलट मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात असा घणाघात त्यांनी केला.
या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. कुणाच्या आशिर्वादाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं मुंबईत वास्तव्य वाढलं असा सवाल त्यांनी केला. ही घाण अगोदर त्यांनी साफ करावी असे आवाहन त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले. आमच्या सरकारवर बोलण्याअगोदर त्यांनी ही घाण साफ करावी असा घणाघात त्यांनी केला.
राणे बांगलादेशींविरोधात आक्रमक
राणे यांनी बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहीम राबवविणार असल्याचे सांगितले. जर ते नाव बदलून राहत असतील तर त्यांनी बोरा बिस्तरा गुंडाळावा आम्ही कोणालाही सोडणार नाही, नितेश राणे यांनी असा इशार बांगलादेशी घुसखोरांना दिला.
त्यांना भारताला इस्लामिक राष्ट्र
बांगलादेशी लोकांना भारत इस्लामिक राष्ट्र करायचे आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.भारतात त्यांना आधार कार्ड कागदपत्र देणार मोठं जाळ आहे. यात बडे मासे अडकणार आहेत तुम्ही बघा आता आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. बांगलादेशी मुसलमानान दूर करणे हे सगळ्याच काम असलं पाहिजे, असे ते म्हणाले. आता राजकारणात बांगलादेशींचा नवीन मुद्दा तापण्याची आणि त्यावरून आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List