Bigg Boss 18 Grand Finale Live Updates: 6 स्पर्धकांमध्ये चुरस; कोण पटकावणार ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी?
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदीसोबतच इतरही भाषांमध्ये या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘बिग बॉस’चा अठरावा सिझन 6 ऑक्टोबर 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आज (19 जानेवारी) या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. तब्बल 105 दिवसांनंतर या शोचा विजेता आज घोषित होणार आहे. ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करणार असून त्यात आमिर खान आणि अक्षय कुमारसारखे सेलिब्रिटीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सिझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी आता फक्त सहा स्पर्धक घरात राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि रजत दलाल यांपैकी ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List