पाच महिन्यापूर्वी सैफच्या हल्लेखोराची मुंबईत एन्ट्री, त्यानंतर…; पोलिसांकडून मोठी माहिती समोर
Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला तीन दिवस झाले आहे. तीन दिवसानंतर सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल आहे. आता पत्रकार परिषदेत पोलिसांनी हल्लेखोराने कोणत्या उद्देशाने सैफ – करीना घुसखोरी केली याचा खुलासा केला आहे. शिवाय किती महिन्यांपूर्वी आरोपी मुंबईत आला याचा देखील पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा मुळचा बांगलादेशी असल्याचा आमचा संशय आहे. आरोपीने बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्यानंतर स्वतःचं नाव बदललं आहे. आरोपीने स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं आहे. आरोपी पाच महिन्यांपूर्वी भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी सुरुवातीला मुंबईत राहिला. त्यानंतर मुंबईतील शहरांमध्ये देखील आरोपी राहिला होता. आरोपी हाऊसकिपिंगच्या एजन्सीत काम करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आलियान असं आरोपीचं नाव त्याचं वय 30 वर्ष आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात प्रवेश केल्याचं आतापर्यंत झालेल्या तपासातून समोर येत आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असून पोलीस कस्टडीसाठी मागणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली. सध्या त्याचा तपास सुरु आहे. त्याचा काहीही पूर्वीचा रेकॉर्ड नसल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही आता ज्या आरोपीला अटक केलं आहे, त्याचा प्राथमिक तपास सुरु आहे. तपासापूर्वी काहीही ठोसपणे सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे. तपास झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल… असं देखील
आतापर्यंत जे काही समोर आले आहे त्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. यानंतर तपासात जे काही समोर येईल, ते आम्ही तुम्हाला देऊ. सध्या या गोष्टींचा तपास सुरु आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला तपास झाल्यानंतर नक्की सांगू असं देखील पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List