धनंजय मुंडे यांचे दोर कापले… पालकमंत्र्यांच्या अख्खा यादीतच नाव नाही, अजितदादांच्या एन्ट्रीने बीडमध्ये साफसफाई होणार?

धनंजय मुंडे यांचे दोर कापले… पालकमंत्र्यांच्या अख्खा यादीतच नाव नाही, अजितदादांच्या एन्ट्रीने बीडमध्ये साफसफाई होणार?

मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर नव्या पालकमंत्र्यांच्या नावाची कधी घोषणा होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखरे पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं मात्र यावेळी त्यांना पालकमंत्रिपद मिळालं नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडची सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत. तर मंत्री पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

धनंजय मुंडेंना धक्का 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनं बीडसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. हाच मुद्दा पकडून विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचे प्रयत्न सुरू आहेत. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तसेच बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याबाबत देखील मोठी उत्सुकता होती.

अखेर पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे, या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नावच नाहीये, म्हणजेच त्यांना बीडच नाही तर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये. तर दुसरीकडे बीडचं पालकमंत्रिपद हे पंकजा मुंडे यांना न देता ते अजित पवार यांनी स्वत:कडे ठेवलं आहे.  पकंजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्याव अशी मागणी देखील करण्यात येत होती, अखेर आता अजित पवार बीडचे नवे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कामांना ते कसा आळा घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

          पालकमंत्र्यांची यादी  

  • गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
  • नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
  • ठाणे – एकनाथ शिंदे
  • पुणे – अजित पवार
  • बीड – अजित पवार
  • सिंधुदुर्ग- नितेश राणे
  • अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
  • वाशिम – हसन मुश्रीफ
  • सांगली – चंद्रकांत पाटील
  • सातारा -शंभुराजे देसाई
  • छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
  • जळगाव – गुलाबराव पाटील
  • यवतमाळ – संजय राठोड
  • कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
  • अकोला – आकाश फुंडकर
  • भंडारा – संजय सावकारे
  • बुलढाणा – मकरंद जाधव
  • चंद्रपूर – अशोक ऊईके
  • धाराशीव – प्रताप सरनाईक
  • धुळे – जयकुमार रावल
  • गोंदिया – बाबासाहेब पाटील
  • हिंगोली – नरहरी झिरवळ
  • लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
  • मुंबई शहर – एकनाथ शिंदे
  • मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
  • नांदेड – अतुल सावे
  • नंदुरबार – माणिकराव कोकाटे
  • नाशिक – गिरीष महाजन
  • पालघर – गणेश नाईक
  • परभणी – मेघना बोर्डीकर
  • रायगड – अदिती तटकरे
  • सिंधुदुर्ग- नितेश राणे
  • रत्नागिरी – उदय सामंत
  • सोलापूर – जयकुमार गोरे
  • वर्धा – पंकज भोयर
  • जालना – पंकजा मुंडे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच...
अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
शमीचे पुनरागमन, बुमराही खेळणार, सिराज बाहेर!
जोगेश्वरीतील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा; पालिका आयुक्त बोलवणार बैठक, शिवसेनेच्या मागणीला यश
सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
केईएमच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नोकरीतला वारसा हक्क कायम, कामगारांचा भव्य विजयी मेळावा