Maharashtra Breaking News LIVE 18 January 2025 : छगन भुजबळ यांची नाराजी दूर? आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला राहणार हजर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजपासून शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प अधिवेशन पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत मंथन होणार आहे. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ अजित पवार आमने- सामने येणार आहेत. माजी मंत्री असलेलेछगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर भाजपचे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आज बैठक होणार आहे. लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आजपासून दोन दिवस ही बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी तसेच चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीस उपस्थित राहतील. हिंदुत्वाच्या मुद्यावर संघनेते भाजप मंत्र्यांना कानमंत्र देणार आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 80 हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केला आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा ७०० रुपयांनी सोने महाग होऊन सोन्याचे दर 80 हजार 400 रुपये एवढे झाले आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List