सैफ अली खानच्या शेजारी राहते ‘ही’ अभिनेत्री, इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल म्हणाली…
अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी मध्यरात्री हल्ला झाला आहे. अभिनेत्याच्या राहत्या घरी म्हणजे वांद्रे याठिकाणी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी अभिनेत्यावर हल्ला केला आहे. सध्या अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोराने वार केल्याने सैफला सहा जखमा झाल्या. सैफ अली खानला पहाटे 3.30 वाजता मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता अभिनेत्याती प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, करीना आणि सैफ यांच्या समोरच्या इमारतीत राहणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. करिश्मा म्हणाली, ‘सध्या इमारतीच्या बाहेरचं चित्र प्रचंड भयानक आहे. सर्वत्र पोलीस आणि मीडिया दिसत आहे.’
सुरक्षेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी गेल्या वर्षापासून इमारतीच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करत आहे. वॉचमनला योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. अशा आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार नाहीत. जर चोर घुसला तर कुटुंब स्वतःचे संरक्षण कसे करणार? हे भयानक आहे…’
पुढे अभिनेत्री म्हणाले, ‘घडलेल्या घटनेनंतर इतर लोकं सावध होतील अशी अपेक्षा मी करते. अशा संकटाचा सामना करण्यास कोणतंही कुटुंब तयार नाही. आता माझ्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येईल… यावर माझा विश्वास आहे.’ सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची चौकशी
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे तपासावर परिणाम होत आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती ३२ तासांनंतरही फरार आहे. वांद्रे पोलीस संपूर्ण माहिती देत नसल्याचा दावा गुन्हे शाखेच्या सूत्रांनी केला आहे. तब्बल 5 तासांनंतर मध्यरात्री या हल्ल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. वांद्रे पोलिसांकडे या गुन्ह्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर आहे.
पोलिस आणि गुन्हे शाखेच्या श्रेयवादाचा फायदा आरोपीला होत असल्याचे दिसत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना अजूनही आरोपीची माहिती मिळत नाही. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी त्या वेळी वांद्रे टर्मिनसवरून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये लोकांना पाठवले जात आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणाऱ्या सर्व ऑटोचालकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List