राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश

राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये कोणाचा समावेश? 

उद्या म्हणजेच 17 जानेवारीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेवादीर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये 20 नावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.

असा असेल दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवाराला वीस जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

भाजप – आपमध्ये चूरस  

याही विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत पुन्हा एकदा भाजप आणि आपमध्ये चूरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे, भाजप आणि आपमध्ये दिल्लीत काटे की टक्कर होऊ शकते. त्यामुळे भाजप अरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन सत्ता स्थापन करणार की, पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपचीच सत्ता येणार? हे पाहाणं महत्त्वांच ठरणार आहे.  या निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्याचा देखील प्रभाव या निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan : अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला Saif Ali Khan : अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत...
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
‘अभयने आमचे फोन नंबर ब्लॉक केले…’, IIT बाबाच्या वडिलांचे भावूक उद्गार
जखमी सैफला मुलाने ऑटो रिक्षातून लीलावतीत नेले, हल्ल्यानंतर काय घडलं नेमकं?
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानची एन्ट्री, पाकच्या माजी मंत्र्यानं जोडला भारतातील या संघटनेशी हल्ल्याचा संबंध
सैफ अली खानवर हल्ला, बाबा सिद्दीकींची हत्या अन्…; वांद्रे परिसर हिट-लिस्टवर? मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सैफ अली खानला चाकूने भोसकले… हल्ल्यानंतरचे 5 प्रश्न अन्… पोलीस तपासात काय काय घडतंय?