‘या’ 5 भाज्या अंडी-चिकनपेक्षा कमी नाहीत, आरोग्यशास्त्र काय सांगतं?
आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला प्रथिनांची कमतरता टाळता येईल. थंड हवामानात तुम्ही ताज्या हिरव्या वाटाण्याचं सहज सेवन करू शकता. तसेच पालक, बटाटे यांचेही सेवन फायदेशीर आहे.
शाकाहारी अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता सर्वात जास्त दिसून येते. कारण सर्वाधिक प्रथिने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळतात. यामुळे शरीरात प्रथिनांची कमतरता, स्नायू कमकुवत होणे, यकृताचे आजार, थकवा, सूज येणे, मूड स्विंग्स अशा समस्या सतत वाढण्याचा धोका जास्त असतो.
आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला प्रथिनांची कमतरता टाळता येईल. शाकाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रथिने नसली तरी अनेक पोषक द्रव्ये मुबलक असल्याने ते शरीरातील प्रथिनांचे संतुलन बिघडू देत नाहीत.
एका दिवसात किती प्रथिने खावी?
शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ग्रॅम 0.8 ते 1 ग्रॅम प्रथिने खावीत. स्नायूंचा वस्तुमान वाढवायचा असेल तर रोज 69 ते 102 ग्रॅम प्रथिने घ्यावीत. त्याचबरोबर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी रोज 1.2 ते 1.6 ग्रॅम प्रथिने प्रति किलो शरीराचे वजन याप्रमाणे असावी.
हिरवे वाटाणे
थंड हवामानात तुम्ही ताज्या हिरव्या वाटाण्याचं सहज सेवन करू शकता. 1 कप हिरव्या वाटाण्यामध्ये 7.9 ग्रॅम पर्यंत प्रथिने आढळतात. हे फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहे. अशावेळी पोषण आणि प्रथिने वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या आवडत्या पास्ता, सूपमध्ये मटार मिसळून खाऊ शकता.
पालक
पालक लोहासाठी ओळखला जातो, परंतु त्याच्या सेवनाने प्रथिनांची गरज देखील पूर्ण होते. 1 कप पालकमध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. यासोबतच व्हिटॅमिन ए, के, सी सारखे पोषक घटकदेखील असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात.
बटाटा
एक कप शिजवलेल्या बटाट्यामध्ये 3 ग्रॅम प्रथिने असतात. इतकंच नाही तर वर्षभर मिळणारी ही भाजी पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सीची गरजही भागवते.
मशरूम
एक कप मशरूममध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी आणि डी देखील असते, जे हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. अशावेळी मशरूमचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर ठरते.
एवोकॅडो
एक कप एवोकॅडो 4.5 ग्रॅम प्रथिने प्रदान करते. याशिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List