हिवाळ्यात ब्रेकफास्टमध्ये ‘हे’ खा, अल्पावधीत तंदुरुस्त व्हाल

हिवाळ्यात ब्रेकफास्टमध्ये ‘हे’ खा, अल्पावधीत तंदुरुस्त व्हाल

आपल्या रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. कारण अनेकांना वजन वाढण्याच्या समस्या सतावत आहेत. जेव्हा तुम्ही वाढत्या वजनाने त्रस्त झालेले असता तेव्हा वजन नियंत्रणासाठी प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा विचार करता. तेव्हा बहुतेक लोकं डाएट करण्याची शिफारस करतात, अशातच अनेकजण त्यांच्या आहारात स्प्राऊटचे समावेश करतात. कारण स्प्राऊट्समध्ये अनेक पोषक तत्वांचा खजिना देखील आहे. मात्र दैनंदिन प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी अनेक असे काही स्प्राउट्स आहेत जे तुम्ही डाएट मध्ये समावेश करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला प्रथिने तसेच इतर अनेक पोषक तत्वे मिळतील. जर तुम्ही रोज तेच-तेच स्प्राउट्स खाऊन कंटाळला असाल आणि याव्यतिरिक्त तुम्ही स्प्राउट्ससाठी वेगवेगळे प्रोटीनयुक्त पदार्थ शोधत असाल तर या स्प्राऊटसचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा.

वजन कमी करण्यासोबतच स्नायूंना बळकटी देण्यासाठी काही डाळीचे स्प्राउट्स खाणे खूप फायदेशीर आहे. तुमच्या आरोग्यासाठीही याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया वजन नियंत्रणात कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरतात.

 

मेथी स्प्राउट्स आरोग्यदायी

मधुमेह रुग्णांसाठी स्प्राऊटचे सेवन लाभदायक आहे. चण्याचे स्प्राऊट, शेंगदाणे स्प्राऊट, या गोष्टींचे स्प्राउट्स मधुमेह असलेल्या लोकांसाठी हानिकारक नसतात, पण याव्यतिरिक्त ज्या लोकांची रक्तातील साखर नेहमी उच्च असते त्या मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात मेथीदाण्याचे स्प्राउट्स समाविष्ट केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे वजनही नियंत्रणात राहील.

चण्याचे स्प्राउट्स

डाळींऐवजी तुम्ही नाश्त्यात चण्याच्या स्प्राऊट्सचे समावेश करू शकतात. कारण चण्याचे स्प्राऊट्स प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. याशिवाय चण्याच्या स्प्राउट्समध्ये लोह, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. चणा स्प्राउट्समध्ये लिंबाचा रस व थोडे मीठ आणि मिरपूड टाकल्यास चव दुप्पट होते.

शेंगदाणे स्प्राउट्स

अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्याच्या आहारात प्रथिनांसाठी बाजारात उपलब्ध असलेले पीनट बटरचे अधिक सेवन करतात. परंतु बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरमध्ये अस्वास्थ्यकर फॅट असते आणि बरेच प्रिजर्वेटिव घटक देखील असतात, ज्यामुळे फायद्याऐवजी आरोग्यास हानी पोहोचू शकते. म्हणूनच तुमच्या आहारात पीनट स्प्राउट्सचा समावेश करणे हा एक वजन नियंत्रित करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

हिवाळ्यात बनवा या धान्याचे स्प्राऊट

थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन भरपूर परमनंट केले जातात. कारण बाजरीच्या सेवनाने शरीर आतून उबदार राहते. यासाठी जी लोक डाएट करत आहेत त्यांनी बाजरीचे स्प्राउट्स आहारात समाविष्ट करून घेऊ शकतात. हे एक गरम धान्य असले तरी यात प्रथिने, फायबर आणि बऱ्याच पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे आतड्याचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय दम्याच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले