मुंबई क्रिकेटचे ‘कर्णधार रत्न’
अनेक संस्मरणीय घटनांचा साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव दिमाखदार करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने आज मुंबईचे क्रिकेट गाजवणाऱ्या कर्णधारांचा अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी महान फलंदाज सुनील गावसकर, मिलिंद रेगे, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, संजय मांजरेकर, राजीव कुलकर्णी, विनोद कांबळी, नीलेश कुलकर्णी, वसीम जाफर, सिद्धेश लाड, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच मुंबईच्या महिला कर्णधारांचाही सत्कार करण्यात आला. येत्या 19 जानेवारीपर्यंत एमसीएने वानखेडे सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List