IPL 2025 – ‘या’ दिवसापासून सुरू होणार चौकार आणि षटकारांची आतषबाजी, BCCI ने केली घोषणा

IPL 2025 – ‘या’ दिवसापासून सुरू होणार चौकार आणि षटकारांची आतषबाजी, BCCI ने केली घोषणा

IPL मध्ये होणारी चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी आतूर झाले आहेत. जगातील सर्वात मोठी प्रीयमिर लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगचा जगभरात डंका आहे. त्यामुळे जगभरातील क्रिडाप्रेमी IPL च्या रणसंग्रामाची आतुरतेने वाट पाहत असतात. क्रीडाप्रेमींचा प्रतिक्षा आता संपूष्टात आली असून 21 मार्च पासून IPL ला सुरुवात होणार असल्याचे BCCI ने जाहीर केले आहे.

रविवारी (12 जानेवारी 2025) BCCI ची विशेष बैठक पार पडली. या बैठकीमध्ये IPL च्या तारखांसंदर्भात घोषणा करण्यात आली. IPL 2025 ची सुरुवात 21 मार्च पासून होणार आहे. याच दिवशी स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तसेच फायनलचा सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्याच बरोबर WPL च्या सामन्यांसंदर्भात पुढील काही दिवसात घोषणा करण्यात येणार असल्याची यावळी स्पष्ट करण्यात आले. तसेच या बैठकीमध्ये बीसीसीआयचे नवीन सचीन म्हणून देवजीत सैकिया आणि कोषाध्यक्षपदी प्रभातेजसिंग भाटिया यांची निवड करण्यात आली आहे. दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List