गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव

गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांना ओळखलं जातं. या कपलची लव्हस्टोरी देखील सर्वांना माहिती आहे. तसेच शाहरूख खान आणि गौरी खानचे अनेक लग्नाचे, सेटवरचे फोटे नेहमीच व्हायरल होत असतात किंवा उत्सुकता म्हणून सर्च करत असतात. त्यांच्या जुन्या फोटोंना चाहत्यांकडून जास्त पसंतीही मिळते.

गौरी खानचे लग्नाआधीचे खरे नाव काय आहे? 

गौरी खान आणि शाहरूख खानच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण गौरी खानचे लग्नाआधीचे खरे नाव काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. गौरी खानचे लग्नाआधीचे नाव आहे गौरी छिब्बर. होय, गौरीचं लग्नाआधीचे आडनाव हे छिब्बर होते. गौरीच्या वडिलांचे नाव कर्नल रमेशचंद्र छिब्बर होते. तर, आईचे नाव सविता छिब्बर होते.

गौरीचे बालपण दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये गेलं. गौरीने वसंत विहार येथील मॉर्डन स्कूलमधून शिक्षण घेतलं. तिने दिल्लीच्या प्रतिष्ठित लेडी श्री राम कॉलेजमधून इतिहासमध्ये पदवी प्राप्त केली आहे. गौरी आज तिच्या फॅशन आणि इंटिरियर डिझायनिंगमुळे ओळखली जाते.यासाठी तिने NIFT मधून सहा महिन्यांचा कोर्सही केला आहे.

गौरीच्या वडीलांचाही कपड्यांचा व्यवसाय 

दरम्यान गौरीचे वडील कपड्यांचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा भाग होण्यासाठी गौरीने नॅशनल इन्सिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान गौरी आता एक यशस्वी आणि प्रसिद्ध व्यावसायिका आहे. एवढच नाही गौरीची एकूण संपत्ती ही 1600 कोटी रुपये आहे. ती रेड चिलीज एंटरटेनमेंटची सह-संस्थापकही आहे.

दरम्यान गौरी छिब्बर ही धर्माने मुस्लीम असलेला शाहरुख खानच्या प्रेमात पडली. गौरी आणि शाहरूखच्या प्रेमाला आणि लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र दोघांनी तरीही लग्न केलं. गौरी शाहरूखपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ती शाहरूखला भेटली तेव्हा ती अवघ्या 14 वर्षांची होती.

गौरीने शाहरूखचे नावही बदलले होते

आई-वडिलांच्या विरोधाच्या भितीने गौरीने लग्नावेळी शाहरूखचे नावही बदलले होते. गौरीने शाहरुख खानचे नाव बदलून अभिनव ठेवले होते. कारण गौरी हिंदू ब्राह्मण कुटुंबातील, तर शाहरुख मुस्लिम, त्यामुळे त्यांच्या लग्नात धर्म हा मोठा मुद्दा बनला होता. त्यांच्या धार्मिक श्रद्धा वेगळ्या असल्याने गौरीचे पालक त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते.

याशिवाय शाहरुखने नुकतेच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता आणि तो इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत होता. आई-वडीलांच्या भितीने गौरीने त्यांना शाहरूखचं नाव हे अभिनव सांगितलं. होतं. बऱ्याच दिवसांपर्यंत त्यानाही शाहरूखचे खरे नाव माहित नव्हते. मात्र जेव्हा बॉलिवूडमध्ये शाहरूखच्या नावाची जेव्हा चर्चा व्हायला लागली तेव्हा गौरीच्या आई-वडिलांना त्याच्या नावापासून ते कामापर्यंत सर्व माहिती समजली.

मन्नत धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते 

अनेक आव्हानांचा सामना करत शाहरुख खानने प्रचंड मेहनत करत शेवटी पत्नी आणि मुलांना असे आयुष्य दिले आहे जे एखादा पुरुष आपल्या कुटुंबीयांना देण्यासाठी धडपड करत असतो. शाहरुख खानच्या घरात ईदही साजरी केली जाते आणि दिवाळीही. त्याचे घर मन्नत धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. गौरी छिब्बर खान आणि शाहरूख खान म्हणजे बॉलिवूडचे परफेक्ट कपल मानले जातात.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हापूस तर हापूस केसरने पण भाव खाल्ला,पहिली पेटी वाशीत मार्केटला आली हो…किंमती किती पाहा हापूस तर हापूस केसरने पण भाव खाल्ला,पहिली पेटी वाशीत मार्केटला आली हो…किंमती किती पाहा
फळांचा राजा आंबा न आवडणारी व्यक्ती विरळच.. आंबा त्यात हापूस आंब्याचा सुंगध जरी सुटला तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते....
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? कोण-कोण उपस्थितीत राहणार? उद्धव ठाकरे म्हणाले….
कारमध्ये रडत होती आलिया भट्ट? रणबीरने रागाने पापाराझीला ओढले अन्…, व्हिडीओ व्हायरल
लेक आराध्याच्या पार्टीत अभिषेकने असं काही केलं की,चाहते म्हणाले “हे फक्त एक बापच करू शकतो”
मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात
Video – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण – उद्धव ठाकरे
Tata Mumbai Marathon – धावपटूंची मांदियाळी, 60,000 हून अधिक स्पर्धक नशीब आजमावणारं