भाजपा प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खांद्यावर धुरा? स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोणते मिशन?

भाजपा प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खांद्यावर धुरा? स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोणते मिशन?

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा फैसला दरवेळी पुढे ढकलण्यात येत आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणूक, विविध राज्यातील निवडणुका, या प्रत्येकवेळी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ पुढे ढकलण्यात आला. त्यांचा उत्तराधिकारी अजून मिळालेला नसताना आता सात राज्यातील भाजपा अध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू आहे. त्यात महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर, गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे भाजपा मोठा धोरणात्मक बदल करणार की आहे त्याच व्यक्ती या पदावर ठेवणार?

बदलाची चर्चा तोकडीच

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संघटनात्मक घडी विस्कटू नये याची खबरदारी भाजपा घेत असल्याचे कळते. या निवडणुकीपूर्वी कोणताही संघटनात्मक मोठा बदल न करण्याचे धोरण भाजपाने घेतले आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रि‍पदाच्या जबाबदारीसह भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा बजावावी लागण्याची शक्यता आहे.

महाबहुमताने भाजपा सरकार सत्तेत आले आहे. भाजपाचे प्रदेश महाअधिवेशन येत्या रविवारी , 12 जानेवारी रोजी शिर्डी होत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करतील. नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार आहे. सात महिन्यांपासून ते मंत्रीपदासह भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. बावनकुळे यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ही जबाबदारी त्यांच्यावर कायम असावी, असे वरिष्ठ नेत्यांची भावना असल्याचे समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटना, कार्यकर्त्यांशी संवाद, संघासोबतचे ट्युनिंग आणि त्यांच्या कोपरा बैठक, मायक्रो प्लॅनिंगसोबत चांगला ताळमेळ बसल्याने पक्षाला अभूतपूर्व असे यश मिळाले. बावनकुळे यांनी आता सदस्य वाढविण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांना या पदावर कायम ठेवण्यात येईल असे चित्र आहे. तर भाजपा काही महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता बघता संघटनात्मक घडी विस्कटू न देण्याचे भाजपाचे धोरण समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय? जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय?
मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार...
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार
अदानी समूह आणि एसआरएची दादागिरी शिवसेनेने मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला अखेर ब्रेक
अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला आदित्य ठाकरे यांचा विरोध
देशातील सर्वात महाग एक्स्प्रेस वे, बनवण्यासाठी लागले 22 वर्ष, टोल टॅक्स सर्वात जास्त
शिक्षकांचा पगार रखडला, अजितदादांचा थेट अर्थविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन, मिनिटात निकाल
परळीत आका आणि त्यांच्या आकाचे वेगवेगळे उद्योग, पुण्यासह वाल्मीक कराडची कुठे-कुठे किती संपत्ती? पैठणमध्ये सुरेश धस यांचे एकामागून एक गौप्यस्फोट