रात्रभर दारू पितो, स्मोक करतो,स्वत:वर कंट्रोल नाही; आमिर खानच्या सवयी ऐकून नाना पाटेकरांचा सल्ला
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान त्याच्या अभिनय, चित्रपटांप्रमाणेच त्याच्या स्पष्ट बोलण्याबद्दलही तेवढाच प्रसिद्ध आहे. तो बोलायला कधीच मागे पुढे पाहत नाही. मग तो विषय चित्रपटांबद्दलचा असो किंवा स्वत:च्या खाजगी आयुष्याचा. एका मुलाखतीत आमिर खानने त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल अशाच काहा धक्कादायक गोष्टी सांगितल्या की त्या जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
आमिर खानने ‘झी म्युझिक कंपनी’च्या यूट्यूब चॅनलवर नाना पाटेकर यांच्या मुलाखतीसारखंच एक चर्चासत्र झालं.त्यात आमिरने त्याच्या वाईट सवयींबद्दल सांगितलं आहे. आमिरने त्याच्या ज्या सवयी सांगितल्या त्या ऐकून घेतल्यानंतर नाना पाटेकर यांनाही आश्चर्य वाटलं त्यावर त्यांनी आमिरला एक सल्लाही दिला.
आमिर खानला कोणत्या वाईट सवयी आहेत?
नाना पाटेकर यांच्याशी संवाद साधताना आमिर खानने आपला जुना काळ सांगितला. त्याने सांगितले की त्याला काही वाईट सवयी होत्या ज्यात तो हरवला होता. त्याला सिगार ओढण्याची आणि दारू पिण्याची आवड होती. आमिर अजूनही पाईप ओढतो पण दारू सोडल्याचं त्याने सांगितलं आहे. आमिर खानच्या आयुष्यात कोणतीही शिस्त नव्हती आणि त्याने आपले आयुष्य असेच जगले असल्याचं त्याने सांगितले.
आमिर म्हणाला, हो, मग मी नेहमी वेळेवर होतो. जेव्हा मी चित्रपट करायचो तेव्हा शिस्त होती पण जेव्हा मी करत नाही तेव्हा कोणतेही नियम नव्हते. मी एक पाईप धुम्रपान करतो. आता मी दारू पिणे सोडून दिले आहे पण एक वेळ अशी होती की मला दारू पिण्याची सवय होती. आणि मग मी रोज रात्री प्यायचो.
आमिर खान पुढे म्हणाला, ‘समस्या ही आहे की मी जे काही करेल ते जास्तीच करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे दारू प्यायला लागल्यावर मी पितच राहिलो. ही सवय माझ्यात खूप वाईट आहे हे मला माहीत आहे आणि मलाही ते जाणवते. मी चुकीचे करत आहे हे देखील मला माहीत आहे पण मी स्वतःला थांबवू शकत नाही.” असं म्हणत त्याने स्वत:च्या वाईट सवयींबद्दल सांगितले.
नाना पाटेकरांनी आमिरला दिलेला सल्ला
या संभाषणात आमिरने असेही सांगितले की, तो जेव्हा एखादा चित्रपट करतो तेव्हा तो शिस्त पाळतो. पण त्याच्याकडे चित्रपट किंवा कोणतही प्रोजेक्ट नसेल तर तर त्याचे मन वेडे होऊ लागते आणि मग पुन्हा दारू पिणे, पार्टी करणे आणि धूम्रपान करणे सुरू होतं. अशा स्थितीत नाना पाटेकर यांनी आमिर खानला सल्ला दिला.
नाना पाटेकर म्हणाले “तुम्ही चित्रपट करत राहा. जर तुम्ही चित्रपट केले तर तुम्ही वाईट गोष्टींपासून दूर राहाल आणि कामात व्यस्त राहाल.” असं नानांनी म्हटल्यावर आमिरने म्हटलं ‘हो, मी निश्चितच ठरवलं आहे की मी एका वर्षात एक चांगला चित्रपट नक्की करेन आणि त्याच्या तयारीसाठी मी संपूर्ण वर्ष घालवणार आहे.’ असं म्हणत नानांनी दिलेला सल्ला त्याला पटला असून त्याला तो मान्य असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List