उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाचा नेता अजितदादांच्या गळाला
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहे. पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता नांदेडमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पवाडे आणि माजी आ अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे आणि माजी आमदार अविनाश घाटे यांनी शिवबंधन तोडत घड्याळ हाती घेतलं आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार , आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आमदार चिखलीकर यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटासोबतच भाजपच्या पदाधिकाऱ्यानं देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात देखील मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक होते, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा त्यातील एका नगरसेवकाने शिंदे यांना पाठिंबा दिला, तर नऊ नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. दरम्यान त्यातील आता पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे चारच नगरसेवक राहिले आहेत.
भाजपमध्ये अंतर्गत नाराजी?
मात्र समोर आलेल्या माहितीनुसार या माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List