“तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च?

“तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च?

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पातील टप्पा १ च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराची तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे. याशिवाय, प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाच्या टप्पा-1 च्या कामाची एकूण किंमत ₹180.99 कोटी इतकी आहे. यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या टप्पा-1 अंर्तगत एक इंटरप्रिटेशन सेंटर देखील बांधण्यात आले आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 1530.44 चौ. मी. आहे.

हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून, तळघरात कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय या दालनांचा तसेच प्रसाधनगृह आणि देखभाल कक्ष यांचा समावेश आहे. प्रवेशव्दार इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 3099.84 चौ. मी. आहे, ज्यात बहुउद्देशीय सभागृह, सुरक्षा नियंत्रण कक्ष, भूमिगत वाहनतळ (27 वाहने) आणि वाहनांसाठी दोन स्वतंत्र उद्वाहकांचा समावेश आहे. तसेच, प्रशासकीय इमारत 639.70 चौ. मी. क्षेत्रफळाची आहे. यामध्ये उपहारगृह, कलाकार दालन कक्ष, प्रसाधनगृह आणि न्यासाचे अध्यक्ष व सचिव कार्यालये यांचा समावेश आहे. इमारतीचे छत आधुनिक मंगलौरी कौल पद्धतीने बांधण्यात आले आहे.

बाह्य विकासाची कामे

महापौर निवासस्थान आणि इतर संबंधित इमारतींव्यतिरिक्त, 3.00 एकर जागेत बागबगीचा तयार करून परिसराचे सुशोभिकरण करण्याचे कामे करण्यात आले आहे. या कार्यामुळे संपूर्ण परिसर सुंदर आणि आकर्षक झाला आहे.

यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन, महापौर निवासस्थान इमारतीत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी विविध छायाचित्रे, दृष्यचित्रे आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल. टप्पा 2 अंतर्गत प्राधिकरणाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेवांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक यांचा समावेश असेल.

या प्रकल्पाच्या टप्पा 2 च्या कामासाठी मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कंत्राटदाराची नेमणूकची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार