जानेवारीत ‘या’ ४ सर्वोत्तम हिल स्टेशन्सला करा एक्सप्लोर, आताच करा ट्रिप प्लॅन

जानेवारीत ‘या’ ४ सर्वोत्तम हिल स्टेशन्सला करा एक्सप्लोर, आताच करा ट्रिप प्लॅन

जानेवारी महिना म्हंटल की या दिवसात वातावरणात थंडावा असतो. त्यामुळे जानेवारी महिना हा अनेकांना खूप आवडतो. या दिवसांमध्ये तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जातात किंवा बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी जेव्हा बर्फाच्छादित पर्वत, थंड वारे आणि शांत वातावरणात जात तेव्हा प्रत्येक पर्यटकाला तेथील दृश्य आकर्षित करते. जर तुम्हालाही जानेवारीमध्ये आश्चर्यकारक दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल तर भारतातील ही 4 हिल स्टेशन्स तुमच्या बकेट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे. इथलं सौंदर्य, शांतता आणि थरारक अनुभव तुम्हाला बराच काळ आठवत राहील.

जानेवारीतील ही सर्व हिल स्टेशन्स त्यांची अनोखी आकर्षणे, रोमांचक कार्यक्रम आणि शांत वातावरण यासाठी आदर्श आहेत. अशातच तुम्हाला जर बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा असेल तसेच शांत धबधबे यांचा आनंद घ्यायचा असेल किंवा कॉफीच्या बागांमध्ये फिरायचं असेल, सगळीकडे या सर्वांचा तुम्हाला जर एक वेगळाच अनुभव पाहायचा असेल तर या 4 हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या.

मनाली

हिवाळ्यात मनाली हे बर्फाच्या चादरीने झाकलेले जादुई ठिकाण बनते. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू खोऱ्यात वसलेले हे हिल स्टेशन जानेवारीमध्ये स्नोबोर्डिंग, स्कीइंग आणि विंटर वॉकसाठी उत्तम ठिकाण आहे. सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास सारख्या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही स्नो स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. मनाली हे पाइन जंगलांमध्ये असलेले आरामदायक सुट्टी घालवण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे.

ऋषिकेश

जानेवारीमध्ये ऋषिकेशचे थंड हवामान हे तुम्हाला रोजच्या गडबडीतून शांतता मिळण्यास आणि ट्रेकिंगसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण आध्यात्मिक शांतता आणि गंगा नदीच्या काठावर राफ्टिंगसारख्या साहसी उपक्रमांसाठी ओळखले जाते. लक्ष्मण झुला, परमार्थ निकेतन सारखी ठिकाणे तुमचा प्रवास संस्मरणीय बनवतील.

नैनीतालमध्ये बर्फाची जादू

उत्तराखंडमधील नैनीताल जानेवारीमध्ये धुके आणि बर्फवृष्टीमुळे अधिकच सुंदर बनते. नैनी तलावाभोवती वसलेल्या या शहरात पर्यटकांची संख्या कमी असल्याने शांतताप्रिय लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण बनले आहे. तेथील थंडगार हवामान तसेच शांत वाहणारे धबधबे तसेच आजूबाजूच्या दऱ्यांमध्ये ट्रेकिंग तुम्हाला एक नवा अनुभव देईल.

कुर्ग

दक्षिण भारतातील कूर्ग, ज्याला “भारताचे स्कॉटलंड” म्हणून देखील ओळखले जाते, हिरव्यागार कॉफीच्या बागा, उंच टेकड्या आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. जानेवारीमध्ये येथील हवामान थंड आणि आल्हाददायक असते, जे ट्रेकिंग, वन्यजीव सफारी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. शहराच्या धकाधकीपासून दूर निवांत जागा शोधत असाल तर कुर्ग तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच...
अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
शमीचे पुनरागमन, बुमराही खेळणार, सिराज बाहेर!
जोगेश्वरीतील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा; पालिका आयुक्त बोलवणार बैठक, शिवसेनेच्या मागणीला यश
सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
केईएमच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नोकरीतला वारसा हक्क कायम, कामगारांचा भव्य विजयी मेळावा