या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…

या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…

हिवाळ्यात भरपूर भाज्या बाजारात असतात. त्यात हिरवे मटार ही भाजी अनेकांची आवडती असते. त्यामुळे ओले मटार बाजारातून घरी आवर्जून आणले जातात. मुळात म्हणजे ते कच्च्या स्वरूपातही आपण खाऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच जणांचे हिरवे मटार ही आवडीची भाजी असते.

वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, जस्त, लोह, मँगनीज, तांबे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. पण हा वाटाणा काही लोकांसाठी अपायकारक आहे. काही लोकांनी हिरवा वाटाणा खाणे टाळणे योग्य राहिलं. असं का ते पाहुयात.

हिरवे वाटाणे खाण्याचे दुष्परिणाम

हिरवे वाटाणे हा पोषक तत्वांचा खजिना जरी असला तरी त्याचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. एवढेच नाही तर काही लोकांसाठी तर ते विषसामान आहेत. ज्यांच्या शरीरात हिरवा वाटाणा विषासारखे काम करतो. यासोबतच जाणून घ्या जास्त वाटाणा

या लोकांनी चुकूनही खाऊ नये हिरवे वाटाणे

मटारमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई, जस्त, लोह, मँगनीज, तांबे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. ज्या लोकांना मधुमेह, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित समस्या आणि गॅसची समस्या आहे त्यांनी मटार खाऊ नये.

किडनी स्टोन
ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी हिरवे वाटाणे खाताना काळजी घ्यावी. मटारमध्ये प्युरिन असतात, जे यूरिक ऍसिडमध्ये मोडतात आणि त्यामुळे किडनी स्टोन होण्याची समस्या अधिक वाढते.

पोटफुगी
फायटिक आणि लेक्टिन हिरव्या मटारमध्ये आढळतात, ज्यामुळे पोट फुगल्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त वाटाणे खाल्ल्याने पोटदुखी आणि सूज देखील होते. ज्यांना कच्चे वाटाणे खायला आवडतात त्यांनी हे लक्षात ठेवावे.

मधुमेह
मटारमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला जार मधुमेह असेल ते मर्यादित प्रमाणातच खावे.

पोषक तत्वांची कमतरता
जास्त वाटाणे खाल्ल्याने काही वेळा शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यात असलेले लेक्टिन आणि फायटिक ॲसिड पोषक तत्वांचे शोषण कठीण करतात.

 

(डिस्क्लेमर:  वरील माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून घेतलेली आहे.  त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या) 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं
ज्या महिलेची आकलन क्षमता कमी आहे तिला आई होण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित...
भाजपा प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खांद्यावर धुरा? स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोणते मिशन?
दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट; खळखळून हसवणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर
हंसिका मोटवानीच्या वहिनीने सासू, नणंद अन् पतीविरोधात दाखल केला FIR; नेमकं काय आहे प्रकरण?
उदित नारायण यांच्या इमारतीला आग, एकाने गमावले प्राण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पुनर्वसनात पती-पत्नीला दोन घरे मिळणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा; स्वतंत्र झोपडीचा दावा फेटाळला
मुंबईत घर मिळण्याची गिरणी कामगारांची आशा पल्लवित, वरळीतील पाच एकरचा भूखंड महापालिकेकडेच राहणार