साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 5 जानेवारी 2025 ते शनिवार 11 जानेवारी 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 5 जानेवारी 2025 ते शनिवार 11 जानेवारी 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रसंगाला सामोरे जा

बुध, मंगळ षडाष्टक योग, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचे मुद्दे इतरांना वादग्रस्त वाटतील. तणाव होईल. मतभेद होतील. कुशलता, संयम ठेवून प्रसंगाला सामोरे जा. नोकरीत काम, ताण जाणवेल. प्रतिष्ठा राहील. धंद्यात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपयशाचे खापर तुमच्यावर फोडण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दि. 9, 10

वृषभ – कामात चूक टाळा

बुध, मंगळ षडाष्टक योग, चंद्र, गुरू युती. कोणतीही समस्या सोडवणे सोपे नाही. मतभेद, तणाव व चिंता यामुळे अस्वस्थ राहाल. खर्च वाढेल. नोकरीत तडजोड ठेवा. कामात चूक टाळा. धंद्यात अरेरावी, भांडण नुकसानकारक. घरातील वरिष्ठांची चिंता. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही विधान वादग्रस्त ठरू शकते. दौऱ्यात सावध रहा.

शुभ दि. 5, 6

मिथुन – महत्त्वपूर्ण कामे करा

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वपूर्ण कामे करा. थोरामोठय़ांचे सहकार्य सर्व ठिकाणी उपयुक्त ठरेल. नोकरीत गैरसमज दूर करून वरिष्ठांना खूश करता येईल. धंद्यात आळस नको. फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दौऱ्यात, कार्य नियोजनात प्रभाव पडेल.

शुभ दि. 5, 6

कर्क – सहनशीलता बाळगा

चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य चंद्र षडाष्टक योग. कोणतेही काम करताना सावध रहा. सहनशीलता बाळगा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कायदा मोडेल असे कृत्य टाळा. नोकरीत अरेरावी नके. यांत्रिक बिघाडाने  कामात व्यत्यय येईल. धंद्यात नुकसान टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अस्थिरता, तणाव यामुळे मन त्रस्त होईल.

शुभ दि. 6, 7

सिंह – प्रकृतीवर ताण येईल

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेऊ नका. थोरामोठय़ांची चर्चा, भेट यात यश मिळेल. कोणतेही वक्तव्य संतापाने करू नका. प्रकृतीवर ताण येईल. नोकरीत कठीण कामे करावी लागतील. धंद्यात वाढ, लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे मांडता येतील.

शुभ दि. 8, 9

कन्या – धंद्यात नुकसान टाळा

चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. गरज असेल तेथेच तुमचे मत व्यक्त करा. विनाकारण गैरसमज होईल. काळजी घ्या. नोकरीत बुद्धिचातुर्य दाखवता येईल. धंद्यात नुकसान टाळा. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणा नको. तुमचा गैरवापर केला जाईल. सावध रहा. क्षुल्लक मोहाला बळी पडू नका.

शुभ दि. 6, 10

तूळ – तणाव दूर होईल

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. कुशलतेने कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीतील तणाव वाढू देऊ नका. काम व्यवस्थित पार पाडा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. मेहनत घ्या. प्रतिष्ठा जपता येईल. परिचय उत्साहवर्धक ठरेल. घरगुती जबाबदारी पार पाडाल.

शुभ दि. 8, 9

वृश्चिक – दूरदर्शी निर्णय घ्याल

चंद्र, मंगळ त्रिकोण योग, चंद्र गुरू युती. धाडस, कौशल्य वापरून प्रश्न सोडवा. विचलित झाल्यास तणाव होईल. नोकरीत हुशारी दाखवता येईल. धंद्यात वाढ होईल. दूरदर्शी निर्णय घ्याल. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संबंध दृढ करता येतील. प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियतेत कमी जाणवेल. कठीण प्रश्न सोडवणे जिकिरीचे ठरेल.

शुभ दि. 5, 6

धनु – रागावर ताबा ठेवा

बुध, मंगळ षडाष्टक योग, चंद्र, शुक्र लाभयोग. मोठेपणाची जबाबदारी निभावणे कठीण वाटेल. कोणताही मुद्दा सरळ मांडला तरी वाद होईल. मित्र मदत करतील. दौऱयात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. नोकरीतील कामे वाढतील. धंद्यात खर्च, वाद होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सत्तेचा वापर कुशलतेने, चातुर्याने करा.

शुभ दि. 7, 8

मकर – प्रकृतीची काळजी घ्या

बुध, मंगळ षडाष्टक योग, चंद्र शुक्र लाभयोग. संयम, सहनशीलता व कुशलता ठेवा. टीका करताना आपण बळी पडणार नाही ना याची काळजी घ्या. कायदा पाळा. प्रतिष्ठा सांभाळा. नोकरी टिकवा. प्रकृतीची काळजी घ्या. दौऱयात वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.

शुभ दि. 5, 6

कुंभ – सतर्क रहा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र बुध त्रिकोणयोग. कठीण प्रश्न सोडवण्यात यश मिळवता येईल. विरोधकांना शह देता येईल. घरात आनंदाची बातमी मिळेल. नोकरीतील किचकट कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य डावपेचाबाबत सतर्क रहा. प्रतिष्ठा, लेकप्रियता वाढेल. ज्ञानात भर पडेल.

शुभ दि. 6, 7

मीन – प्रत्येक दिवस यशाचा

चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र बुध त्रिकोणयोग. कोणताही कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. प्रत्येक दिवस यश देईल. भावना व कर्तव्य नीट समजून घ्या. गोड बोलण्यावर भाळू नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. लाभ होईल. धंद्यात उतावळेपणा नको. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीकारक वातावरण. वरिष्ठांचे योग्य सहकार्य मिळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावणे नऊ लाखांचे हेरॉईन जप्त  पावणे नऊ लाखांचे हेरॉईन जप्त 
पावणे नऊ लाख रुपयांचे हेरॉईन तस्करीप्रकरणी एकाला बोरिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. परवेझ अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार...
भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं