लीलाला पाहून एजे अस्वस्थ; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नवा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीला आणि एजेचं नातं एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. लीला घरी कबूल करते की तिला स्वयंपाक येत नाही, त्यामुळे एजे तिला खीर बनवायला शिकवतो.
लीलाच्या सासरी तिचे कुटुंबीय आले असता दुर्गा त्यांचा अपमान करते. लीला ती खीर अंतराच्या फोटोसमोर ठेवते, ज्यामुळे एजे नाराज होतो. लीला एजेला समजावून सांगते की, "अंतरा माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, खीर तिच्यासमोर ठेवणं योग्य वाटतं."
एजे तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करतो. इकडे लीला माहेरी गेली असताना कालिंदी तिला एका गुप्त खोलीत घेऊन जाते. एजेसुद्धा लीलाच्या माहेरी आला आहे. तिथे त्याला त्याला गुप्त खोलीबद्दल कळतं.
दुसरीकडे, लीला एजेला समोर बघून आनंदी आणि समाधानी आहे. एजे विचारात आहे की "लीलाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती गोष्टी लपलेल्या आहेत?" यामुळे तो अधिक अस्वस्थ झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List