कुंभमेळ्यात स्फोट घडवून हजार हिंदूंना मारण्याची धमकी, ‘एक्स’वर लिहिले तुम्ही सगळे गुन्हेगार, अल्लाह इज ग्रेट

कुंभमेळ्यात स्फोट घडवून हजार हिंदूंना मारण्याची धमकी, ‘एक्स’वर लिहिले तुम्ही सगळे गुन्हेगार, अल्लाह इज ग्रेट

कुंभमेळ्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी नसर पठाण नावाच्या ‘एक्स’वरील आयडीवरून देण्यात आली आहे. तुम्ही सर्व गुन्हेगार असून महापुंभात बॉम्बस्पह्ट करून एक हजार हिंदूंना मारणार आहे. ‘अल्लाह इज ग्रेट’ असे ‘एक्स’च्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. 31 डिसेंबर रोजी विपीन गौर नावाच्या तरुणाने डायल-112 यूपी पोलिसांना टॅग करत पोस्ट रीट्विट केली. स्क्रीन शॉटही शेअर केला. यानंतर पोलीस सक्रिय झाले असून कुंभमेळ्यासाठी पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे.

पोलीस पोस्ट करणाऱया व्यक्तीचा शोध घेत असल्याची माहिती प्रयागराजचे पोलीस आयुक्त आणि सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. यापूर्वी खलिस्तान समर्थक दहशतवादी पन्नू याने कुंभमेळ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. 13 जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून सुमारे 50 कोटी लोक त्यात सहभागी होणार आहेत. दरम्यान, धमकी देणाऱया व्यक्तीने त्याच्या बायोमध्ये मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. कट्टर मुस्लिम… आता पोलीस त्या क्रमांकाचा आणि ई-मेलचा तपशील घेत आहेत. ज्यावर हा आयडी बनवण्यात आला होता.

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

प्रयागराजच्या कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात 13 जानेवारी 2025 पासून होणार आहे. चार हजार हेक्टरमध्ये संपूर्ण जत्रा पसरलेली असून कुमंभमेळय़ाच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संपूर्ण मेळा 25 सेक्टरमध्ये विभागला गेला असून त्याआधारे एकूण 56 पोलीस ठाणी आणि 144 चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. यात सिव्हिल पोलिसांची संख्या 18,479 असून 1 हजार 378 महिला पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. सशस्त्र पोलिसांची संख्या 1158 असेल. वाहतूक शाखेत 230 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्याचबरोबर 12 हजार 965 होमगार्डही तैनात करण्यात येणार आहेत.

ऑपरेशन कमांडरकडून पत्र जारी; सतर्क राहण्याच्या सूचना

याप्रकरणी लखनऊ येथील यूपी-112 मुख्यालयाचे ऑपरेशन कमांडर अरविंद कुमार नैन यांनी पत्र जारी केले आहे. त्यांनी लखनऊच्या पोलीस महासंचालकांना अधिसूचना दिली असून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था, लखनऊ, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरक्षा, लखनऊ आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक एटीएस, लखनऊ वरिष्ठ पोलीस अधीक्षक, जिल्हा कुंभ यांना पत्र पाठवून सतर्क बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण मोठी बातमी ! ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण
ठाणे शहरातील पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. बंगल्याच्या आवारात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची...
IIT मुंबईतून इंजीनियरिंग, महाकुंभ 2025 मध्ये चर्चेतील साधू…कोट्यवधींचे पॅकेज सोडून का बनले संन्याशी?
सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईच्या ‘या’ भागात; सर्च ऑपरेशन सुरू
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांनी दिल्या तीन महत्त्वाच्या अपडेट
सहा वार, मणक्यात घुसला चाकूचा तुकडा.. सैफवरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांची माहिती
Saif Ali Khan Attack : ‘फक्त खान आडनाव आहे म्हणून…’, योगेश कदम यांचं आव्हाडांना सडेतोड प्रत्युत्तर
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर मध्यरात्री चाकू हल्ला, नक्की काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे