प्रियंका गांधींवरील त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं, थोरातांनी नितेश राणेंना सुनावलं, म्हणाले जितकी जास्त बडबड तितकी..

प्रियंका गांधींवरील त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं, थोरातांनी नितेश राणेंना सुनावलं, म्हणाले जितकी जास्त बडबड तितकी..

मंत्री नितेश राणे हे कायमच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना आक्रमक भूमिका घेतात. त्यांनी अनेकदा प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला आहे. तसेच  “राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेकींना धरून ते खासदार झालेत” असंही त्यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून, त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

‘केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत! जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!’ असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

 

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे? 

नितेश राणे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.    “केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत” असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे, दरम्यान यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Psoriasis Skincare : लाल डाग, खाज आणि… हिवाळ्यात वाढू शकतो सोरायसिस; ‘या’ टिप्स देतील आराम Psoriasis Skincare : लाल डाग, खाज आणि… हिवाळ्यात वाढू शकतो सोरायसिस; ‘या’ टिप्स देतील आराम
हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे तुमची त्वचा आणि निस्तेज दिसू लागते. त्वचा जास्त प्रमाणात...
75 टक्के तरुणांना ‘या’ कारणामुळे येतो सायलेंट हार्ट अटॅक, ‘या’ चुका टाळा
ज्येष्ठ गायक-नट अरविंद पिळगांवकर यांचे निधन
छत्तीसगडमध्ये चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
‘माझी मुंबई’ अवतरली मनातून कागदावर, बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेला तुफान प्रतिसाद
वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली! प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेच्या  पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
अमरावती एमआयडीसीत विषबाधा, कंपनीतील 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश