आता ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.’, धारावी पुनर्विकास कंपनीला मिळाली नवी ओळख

आता ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.’, धारावी पुनर्विकास कंपनीला मिळाली नवी ओळख

धारावीकरांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेल्या कंपनीला नवीन ओळख मिळाली आहे. धारावी झोपडपट्टींचा पुनर्विकास करणारी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ( डीआरपीपीएल ) कंपनी आता ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ( एनएमडीपीएल ) या नव्या नावाने ओळखली जाणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात नवीन ओळख निर्माण करण्यासाठी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे नवे नाव धारण केले आहे.

धारावीत अनेक जाती आणि धर्माची माणसे रहात असल्याने त्याला मिनी इंडियाच म्हटले जाते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.’ या नव्या नावातून नव्या भारताचा संकल्प व्यक्त होत आहे. मेगा या शब्दातून या प्रकल्पाची भव्यता ध्यानात येते आणि मनावर बिंबविली जाते. धारावीतील झोपडपट्टींचा विकास केल्यानंतर मुंबईची स्कायलाईन बदलणार आहे. येथील रहिवाशांना नवीन मोठे घर मिळणार आहे. त्यामुळे सोयी-सुविधा वाढणार आहेत. नवभारत मेगा डेव्हलपर्स यातून शाश्वत विकास, सकारात्मक बदल यासाठी असलेली कंपनीची वचनबद्धता दिसून येते असे कंपनीने म्हटले आहे.

धारावी पुनर्विकासाच्या या नव्या नामांतराला कंपनीच्या संचालक मंडळाने आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाने ( मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ) देखील मान्यता दिली आहे. हा बदल, पुनर्विकासातील लाभार्थ्यांच्या उज्वल भविष्यासोबतच देशाला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या कंपनीच्या नव्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट ( डीआरपी ) – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए ) आणि अदानी ग्रुप यांच्या भागीदारीतून साकारण्यात आलेला ‘एनएमडीपीएल’ हा विशेष हेतू प्रकल्प ( एसपीव्ही ) आहे. या प्रकल्पाचे केवळ नाव बदलले आहे. त्यातील राज्य सरकारची भूमिका आणि भागीदारी आजही कायम आहे.तसेच, धारावीतील रहिवाशांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा सर्वसमावेशक विकास करण्याच्या एनएमडीपीएलच्या भूमिकेत यामुळे कोणताही बदल होणार नाही.

तांत्रिक अडचणी दूर होणार

वास्तविक धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट ( डीआरपी ) या राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडे आहे. या प्राधिकरणाच्या नावासोबत साधर्म्य असलेल्या डीआरपीपीएल या कंपनीच्या आधीच्या नावामुळे बऱ्याचदा तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. त्या टाळण्यासाठी या नामांतराचा उपयोग होऊ शकेल. नाव बदलले तरीही राज्य सरकारच्या डीआरपी या प्राधिकरणाच्या देखरेखीतच धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिशन मुंबई महानगर पालिका निवडणूक: ठाकरे गटाच्या आढावा बैठका 7 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार मिशन मुंबई महानगर पालिका निवडणूक: ठाकरे गटाच्या आढावा बैठका 7 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार
महायुतीचे सरकार विक्रमी बहुमत मिळून स्थानापन्न झाले आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीतील यश विधानसभा निवडणूकीत राखता आलेले नाही. आता महायुतीतील...
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा मुंबई अन् बॉलिवूड सोडण्याचा निर्णय; नव्या दिशेने वाटचाल
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई?; व्हिडिओ शेअर करून दाखवले प्रेग्नेंसी किट
हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं? जाणून घ्या फायदे…
जळगावमधील घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी प्रक्रिया सुरू; केंद्राने कुटुंबीयांना दिले जागेचे पर्याय
25 तारखेची लढाई अंतिम, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा