बीड जिल्हा पुन्हा हादरला, राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरने उडवले, सरपंचाचा जागीच मृत्यू

बीड जिल्हा पुन्हा हादरला, राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरने उडवले, सरपंचाचा जागीच मृत्यू

बीड जिल्हा पुन्हा हादरला असून राखमाफियांनी परळीत आणखी एका सरपंचाचा बळी घेतला. राखेची बेकायदा वाहतूक करणाऱया डंपरने मिरवट फाटा येथे दिलेल्या धडकेत सौंदना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात की घातपात याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील राखमाफियांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सौंदना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी रात्री शेतातील काम आटोपून आपल्या घराकडे जात असताना नीरवट फाटय़ावर बेकायदा राख घेऊन जाणाऱया भरधाव टिप्परने क्षीरसागर यांची गाडी उडवली. या भीषण अपघातात अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच टिप्पर चालक गाडी तेथेच सोडून पळून गेला. टिप्परने दिलेली धडक एवढी जोरदार होती की क्षीरसागर यांच्या वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

हा राखेच्या बेकायदा वाहतुकीचा बळी – धस

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या अपघाताबद्दल शंका उपस्थित केली आहे. हा अपघात की घातपात याचा उलगडा अजून झालेला नाही, असे नमूद करतानाच परळीतील औष्णिक प्रकल्पातील राखेच्या बेकायदा वाहतुकीनेच हा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या अवैध व्यवसायाला परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे भ्रष्ट अधिकारी जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

कराडला ‘मोक्का’ लावा, अन्यथा टॉवरवर चढून स्वत:ला संपवेन! संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांचा संताप; गावकऱयांचाही आत्मदहनाचा इशारा

वाल्मीक कराडला ‘मोक्का’ लावला नाही तर उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता गावातील मोबाईल टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेईन, असा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सरकारला दिला आहे. ‘जर या आरोपींना आता सोडले तर हे उद्या ते माझाही खून करतील. त्यापेक्षा मीच स्वतःला संपवून घेतले तर माझ्या भावालाही समाधान वाटेल की, आपला भाऊ स्वतः संपला. तो निर्घृण पद्धतीने मारला गेला नाही’, असे धनंजय म्हणाले. मस्साजोगमधील ग्रामस्थांनीही आक्रमक होत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बायको-मुलासह बाईकवरून फिरायला गेला, पतंगाच्या मांज्याने गळाच कापला, वसईमध्ये काय घडलं ? बायको-मुलासह बाईकवरून फिरायला गेला, पतंगाच्या मांज्याने गळाच कापला, वसईमध्ये काय घडलं ?
मकरसंक्रातीचा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तिळगुळाचे लाडू आणि पतंग.. ही सणाची दोन खास वैशिष्ट्य...
ब्रेन स्ट्रोकनंतर आता टिकू तलसानिया यांची प्रकृती कशी? मुलीने दिली माहिती
Imran Khan: 8 वर्षांनंतर मोडला इमरानचा संसार; बोयको म्हणाली, ‘मला अंधारात ठेवलं आणि…’
‘नवराच सर्वस्व आहे का तुमचा?’, पती हिमांशूबद्दल कमेंट करणारीला अमृताने सुनावलं
हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाताना टाळा या चुका, अन्यथा फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग आत्ताच करा हे घरगुती उपाय
लवकर वजन कमी केल्याने शरीराचे नुकसान होते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून