संतोष देशमुख हत्या प्रकरण : तो बडा नेता कोण? अंजली दमानियांच्या नव्या ट्विटनं खळबळ

संतोष देशमुख हत्या प्रकरण : तो बडा नेता कोण? अंजली दमानियांच्या नव्या ट्विटनं खळबळ

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता वीस दिवस झाले आहेत.  मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये, त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांंनी केलेल्या नव्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

‘सीआयडी ला स्कॉर्पियो गाडी मधे २ मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकवर करण्यात येत आहे, त्यामेधे संतोष देशमुख ना मारहाण करतानाचे वीडियो आहेत पण एका बड्या नेत्याचा फ़ोन गेला हे देखील आहे…. कोण आहे हा बडा नेता तत्काळ नव जाहीर करा’ असा सवाल करणारं ट्विट दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे हा बडा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

प्रकरण तापलं

संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला वीस दिवस उलटले आहेत, मात्र या प्रकरणातील काही फरार आरोपींना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाहीये, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शनिवारी बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं आक्रोष मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर पकडावं, वाल्मिकी कराड यांना अटक करावी तसेच जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या मोर्चातील नेत्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात आता अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांच्या नव्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’! शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’!
अभिनेता शशांक केतकरने 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शशांक पुन्हा एकदा बाबा होणार आहे....
काय ते थर्ड क्लास…; ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारणाऱ्यावर भडकला गश्मीर महाजनी
एका मेसेजमुळे सुरु झाली होती प्रियांका-निकची प्रेमकहाणी; नात्याची सुरुवात फारच हटके, इंट्रेस्टींग लव्हस्टोरी
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला मोठा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणणार, हस्तांतरण प्रक्रियेला वेग
गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला अन् मोठा राडा झाला; जळगावमधील पाळधीत दगडफेक, जाळपोळ आणि संचारबंदी
कौटुंबिक वाद विकोपाला गेला; सख्ख्या भावानंच काढला चार बहिणी आणि आईचा काटा