मुंबईतील हवेचा दर्जा खालवला, मुंबई महापालिकेकडून कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात

मुंबईतील हवेचा दर्जा खालवला, मुंबई महापालिकेकडून कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात

Mumbai Air Pollution : मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालवल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालवला आहे. मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण दिसत आहे. यामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईचा हवा निर्देशांक १०४ इतका नोंदवण्यात आला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईचा हवा निर्देशांक १०४ इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. काही भागात हवेचा निर्देशांक अतिवाईट स्थितीत नोंदवण्यात आला आहे. तर काही भागात वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्थितीत असल्याचे बोललं जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, जुहू, महापे, नेरुळ या ठिकाणी हवेची गुणवत्ताही वाईट असल्याचे नोंद करण्यात आले आहे. मुंबईत सातत्याने होणारे वातावरणातील बदल आणि बांधकामे यामुळे मुंबईतील हवेवर सातत्याने परिणाम होत आहे. यामुळे असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत आहे.

हवेची गुणवत्ता सातत्याने खालावली

मुंबईत वातावरणातील घातक असलेल्या पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर देवनार, कुर्ला , कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने पुढील काही दिवस सातत्याने रस्त्यांवर पाणी फवारणी करत आहे. सध्या ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेची कारवाई काय?

मुंबईतील सर्व 24 वार्डमध्ये ट्रक-माउंटेड फॉग मिस्ट कॅनन युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 100 हून अधिक टँकर रस्त्यावर साफसफाईसाठी तैनात असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. विशेषत: बांधकाम पाडणे आणि उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणांवर मुंबई महापालिकेने लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकाम साइट्स शोधून त्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आला ‘मुन्नाभाई’; कॉपीची पद्धत पाहून अधिकारी हादरलेच, मुंबईतील धक्कादायक प्रकार पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आला ‘मुन्नाभाई’; कॉपीची पद्धत पाहून अधिकारी हादरलेच, मुंबईतील धक्कादायक प्रकार
पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू...
Busy Lifestyle मध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ योगासन करा ट्राय…
रात्री झोपताना या गोष्टीची घ्या काळजी, अन्यथा त्वचा होईल निस्तेज
Chia Seeds Sideeffects: चिया सिड्सचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक…! होतील ‘हे’ गंभीर आजार
Kho-Kho World Cup 2025 – ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाला सुरुवात, दिल्लीत क्रीडारसिकांचा उत्साह शिगेला
वाल्मीक कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा
‘…तर टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार’, संतोष देशमुखांच्या बंधूंचे वक्तव्य