सांताक्लॉजच्या वेषातील डिलीव्हीबॉय घाबरला
देशभरात नाताळचा उत्साह असताना दुसरीकडे डिलीव्हरी बॉयने नाताळनिमित्त घातलेले सांताक्लॉजचे कपडे काढायला लावल्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशच्या इंदौर शहरातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. त्याला हटकणारे हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याचे समजते. व्हिडीओत संबंधित संघटनेचे सदस्य डिलीव्हरी बॉयला हटकून त्याची उलट तपासणी घेताना दिसत आहे.हिंदू सणांच्या दिवशी प्रभू श्रीरामासारखे कपडे, भगव्या रंगाचे कपडे का घालून फिरत नाही, असा सवाल करताना ते दिसत आहेत. तसेच त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्यासही सांगताना दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List