महायुतीने फसवलं, देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्र; जयंत पाटील म्हणाले…
देशात सर्वात महाग वीज ही महाराष्ट्रात मिळते. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, ”वीज बिलात 30 टक्के कपात करणार, असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या चार ते पाच महिन्यांपासून म्हणत आहेत. 30 टक्के कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.”
जयंत पाटील म्हणाले की, राजस्थानमध्ये प्रति युनिटला 7.55 – 8.95 रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये 3.34 ते 6.80 रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट 5.90 रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट 5.16 ते 17.79 रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.”
पाटील पुढे म्हणाले, ”वीज बिलात 30 टक्के कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार, असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी.”
वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.
राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ – ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 11, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List