वायू प्रदूषणाचा प्रकोप… अर्ध्या देशाला नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासले; रिपोर्टमधील दावा चिंताजनक

वायू प्रदूषणाचा प्रकोप… अर्ध्या देशाला नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासले; रिपोर्टमधील दावा चिंताजनक

देशात सध्या प्रदूषणाचा प्रकोप प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावं लागत आहे. या भयंकर प्रदूषणामुळे देशातील अर्ध्याहून अधिक लोकांना घसा, नाक आणि कानाची समस्या उद्भवली आहे. हे आम्ही सांगत नाही. एका रिपोर्टमध्येच हा खुलासा झाला आहे. देशातील प्रदूषणावर एक संशोधन करण्यात आलं. त्यात देशातील 55 टक्के लोक नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासलेले असल्याचं आढळून आलं आहे.

देशातील काही महत्त्वाच्या शहरात अभ्यास करण्यात आला. त्यातून ही आकडेवारी आली आहे. ‘प्रिस्टिन केअर’ नावाच्या आरोग्य संस्थेने हे सर्वेक्षण केले. दिल्ली, मेरठ, फरीदाबाद, नोएडा, गाझियाबाद, रोहतक, चंदीगड, कानपूर आदी शहरात 56,176 लोकांवर आधारित हे संशोधन केले गेले. यातून प्रदूषणामुळे 41 टक्के लोकांना नेत्रविकार असल्याचं आढळून आलं आहे. डोळ्यात पाणी येणे आणि डोळ्यात जळजळ होणे या समस्या या लोकांना जाणवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मास्क घालूनच फिरा

हवेचं वाढतं प्रदूषण ही चिंतेची गोष्ट आहे. प्रदूषणामुळे सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. प्रदूषित हवा नाक आणि कानाच्या संवेदनशील श्लेष्मा आवरणात त्रास निर्माण करू शकते, त्यामुळे नाक आणि कानांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक भागात प्रदूषण अजूनही अत्यंत जास्त आहे, त्यामुळे लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे, असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

डोळे जपा

प्रदूषणाचा परिणाम फक्त नाक आणि कानांवरच नाही, तर डोळ्यांवर देखील पडलेला आहे. अनेक लोकांना डोळ्यांत जळजळ होणे, पाणी येणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वांनीच डोळ्यांच्या आरोग्यालाही विशेष महत्व दिले पाहिजे. प्रदूषण आणि त्याच्या परिणामांनी आरोग्यावर होणारा हानीकारक प्रभाव सहज लक्षात घेतला पाहिजे, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

गरोदर महिलांनी काळजी घ्या

तुम्हाला डोळे , कान, नाक आणि घशाचा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. या बाबतीत बेसावध राहणे धोक्याचं ठरू शकते. प्रदूषणामुळे लोक त्रस्त आहेत. वृद्ध व्यक्ती, मुले आणि गरोदर महिलांना यापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल.

ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना प्रदूषणाचा धोका अधिक आहे. म्हणूनच प्रदूषणापासून वाचण्यासाठी काळजी घ्या. बाहेर पडताना पूर्ण खबरदारी घ्या. नाक, कान, घशाचा संसर्ग असलेल्यांच्या संपर्कात येऊ नका, असं आवाहनही आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया?
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अक्षराच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येतंय. घर...
“सांताक्लॉजला पत्र लिहून सांगेन की..”; ख्रिसमसनिमित्त लीला, शिवा, पारूने सांगितल्या आपल्या इच्छा
‘फक्त वर्षभर डेटिंग अन् त्यानंतर..’; पत्नी शुरासाठी अरबाज खानची खास पोस्ट
पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा
Mumbai crime news – पोलिसांनी चार तासांत वाचवले 4.65 कोटी रुपये
पालकमंत्री पदावरून गोगावले-तटकरेंत बॅनरवॉर
शीव कोळीवाड्यातील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती