‘पुष्पा 2’च्या दिग्दर्शकांकडून इंडस्ट्री सोडण्याची इच्छा व्यक्त; नेटकरी म्हणाले, अल्लू अर्जुन जबाबदार

‘पुष्पा 2’च्या दिग्दर्शकांकडून इंडस्ट्री सोडण्याची इच्छा व्यक्त; नेटकरी म्हणाले, अल्लू अर्जुन जबाबदार

गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा 2’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे सतत चर्चेत आहे. ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. प्रीमिअरला अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर गर्दीचं व्यवस्थापन नसल्याने चेंगराचेंगरी झाली, त्यात महिलेचा श्वास गुदमरला. याप्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनची कसून चौकशी होत आहे. अशातच ‘पुष्पा 2’चे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचं वक्तव्य करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात सुकुमार यांना अशी एखादी गोष्टी, जी त्यांना सोडायची आहे.. त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “सिनेमा”.

सुकुमार यांचं उत्तर ऐकून बाजूलाच बसलेल्या अभिनेता रामचरणलाही आश्चर्याचा धक्का बसला. सुकुमार यांनी कधीच चित्रपट बनवणं सोडू नये असं म्हणत रामचरणने थेट त्यांच्या हातून माईक काढून घेतला. एकीकडे अल्लू अर्जुन कायदेशीर अडचणींना सामोरं जात असताना सुकुमार यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 1’ आणि ‘पुष्पा 2’ या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शक सुकुमार यांनीच केलंय. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. मात्र ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अल्लू अर्जुन वादात अडकला आहे.

चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. काही कागदोपत्री बाबी शिल्लक राहिल्याने त्याला तुरुंगातच एक रात्र काढावी लागली होती. अल्लू अर्जुनच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत. आता त्याच्या अंतरिम जामिनाविरोधात पोलीस कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी महिलेच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतरही अल्लू अर्जुनने थिएटरमधून जाण्यास नकार दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

अल्लू अर्जुनची मंगळवारी पोलिसांनी कसून चौकशी केली. चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या घटनेवरून राजकारणही तापलंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत अल्लू अर्जुनवर काही आरोप केले. मृत्यूविषयी समजल्यानंतरही तो थिएटरमधून निघाला नाही, त्यानंतर रात्री रोड शो केला, असे आरोप त्यांनी अभिनेत्यावर केले. नंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट 40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट
लाडक्या बहिणींना कमळाबाईने न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेला आहे, तर काही भाज्या 30 ते...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी यांचे निधन
राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर बंदी घाला, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
‘शक्ती’ कायद्याची फाईल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, शिवसेनेच्या मागणीला यश
पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या चमकोगिरीच्या ‘चॅनल’ बैठका
फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश