दीपिकाने चिमुकल्या दुआला कुशीत उचलून आणलं समोर; रणवीरने पापाराझींना दाखवला लेकीचा चेहरा
मुलगी दुआ पादुकोण सिंहच्या जन्माच्या जवळपास चार महिन्यांनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पापाराझींना तिचा चेहरा दाखवला. यासाठी त्यांनी खास एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला फक्त पापाराझी आणि फोटोग्राफर्स उपस्थित होते. (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ Viral Bhayani)
सोमवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रणवीर-दीपिकाने त्यांच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदाच पापाराझींना दाखवला. यावेळी त्यांनी पापाराझींना तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली. (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ Viral Bhayani)
यावेळी दीपिकाने बीज रंगाचा ड्रेस घातला होता. तर रणवीरने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला होता. दीपिका आणि रणवीर यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री या फोटोंमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ Viral Bhayani)
दीपिकाने दिवाळीच्या मुहूर्तावर 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आईवडील झाले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ Viral Bhayani)
याआधी इतरही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुरुवातीला त्यांच्या बाळाचा चेहरा माध्यमांसमोर दाखवला नव्हता. रणबीर कपूर - आलिया भट्ट यांनीसुद्धा त्यांची मुलगी राहाचे फोटो क्लिक न करण्यास पापाराझींना विनंती केली होती. याशिवाय विराट कोहली-अनुष्का शर्मा, सोनम कपूर-आनंद अहुजा, रिचा चड्ढा-अली फजल, यामी गौतम-आदित्य धर यांनीसुद्धा अद्याप त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ Viral Bhayani)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List