अनंत अंबानी यांच्यावर बॉलीवूड सिंगर मिका सिंग नाराज? सांगितले लग्नात परफॉर्मसाठी किती मिळाले पैसे
सन 2024 या वर्षांत रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा झाली. अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात देशभरातून नाही तर जगभरातून सेलिब्रिटीज आले होते. हॉलीवूड अन् बॉलीवूड कलाकारांनी या लग्नात परफॉर्म केला. त्यात बॉलीवूड सिंगर मिका सिंग याचाही समावेश होता. मिका नेहमी कन्ट्रोवर्सीसंदर्भात चर्चेत असतो. तो बोल्ड कॉमेंट्स करत लाइमलाइटमध्ये राहत असतो. आता अनंत अंबानी यांच्या लग्नावरुन मिका पुन्हा चर्चेत आला आहे. या लग्नाबाबत त्याने वक्तव्य केले आहे.
मिका सिंग याने अनंत अंबानीच्या ग्रँड लग्नात लाइव्ह परफॉर्म केले होते. त्या लग्नासाठी किती पैसे मिळाले, ते मिका सिंग याने प्रथमच सांगितले आहे. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत मिका म्हणाला की, अनंत अंबानी यांच्या लग्नात मी जोरदार परफॉर्म केला. परंतु त्या लग्नात सर्वांना देण्यात आलेली महागडी घड्याळ मला मिळाली नाही. त्यामुळे मी नाराज आहे.
लग्नात परफॉर्म केल्याबद्दल मला खूप पैसे मिळाले. परंतु सर्वांना दिलेली घड्याळ मला दिली नाही. शो दरम्यान मी अनंत अंबानी यांच्याकडे अपीलही केले होते. मी जाहीरपणे म्हटले होते, जर तुम्ही ऐकत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे. मी तुमचा लहान भाऊ आहे. एक घड्याळ मलाही पाठवून द्या.
किती पैसे मिळाले…
अनंत अंबानी यांच्या लग्नात मिळालेल्या फीबद्दल मिका याने पुढे सांगितले की, मला खूप मोठी फी देण्यात आली होती. पण ही रक्कम किती होती हे मी सांगू शकत नाही. पण जर तुम्हाला अंदाज लावायचा असेल तर मी असे म्हणू शकतो की मला इतके पैसे मिळाले की मी त्यात माझी पाच वर्षे सहज जातील. त्या ठिकाणी माझा असा काही विशेष खर्च झाला नाही. त्यामुळे त्या पैशातून मी माझी पाच वर्षे आरामात राहू शकेन.
मिका सिंगने नुकतेच दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याचाही समाचार घेतला होता. सिद्धार्थ याने अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाबाबत कमेंट केली होती. त्यावर मिका सिंगने सिद्धार्थला खडे बोल सुनावले. तो सिद्धार्थला म्हणाला, हॅलो सिद्धार्थ भाई, पुष्पा 2 वरील तुमच्या कमेंटनंतर एक गोष्ट चांगली झाली की लोकांना तुझ्याबाबत माहिती मिळाली. मलाही अजूनपर्यंत तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List