कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार… सतत थरथर कापतात लोक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका; देशच हादरला
कोरोनापेक्षाही अत्यंत महाभयंकर आजार आला आहे. पूर्व आफ्रिकन देश युगांडामधील बुंडिबुग्यो जिल्ह्यात हा अतिशय रहस्यमयी आजार फैलावला आहे. स्थानिक भाषेत या आजाराला डिंगा-डिंगा (Dinga Dinga) म्हटलं जातं. या आजारामुळे शरीरात अनियंत्रित कंप निर्माण होतो. म्हणजे हा आजार झालेला माणूस सतत थरथरत असतो. लकवा झालेल्या पेशंट सारखा तो थरथरत असतो. त्याचं पूर्ण शरीर थरथरत असतं. त्यामुळे लकवा मारण्याची शक्यताही असते. युगांडातील 300 लोकांना या आजाराने घेरलं आहे. यात महिला आणि मुलींचा अधिक समावेश आहे. महिला आणि मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याने संपूर्ण देशच हादरून गेला आहे.
डिंगा डिंगाची लक्षणं काय?
डिंगा डिंगा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या शरीरात कंपन, ताप आणि अत्याधिक कमजोरी निर्माण करतो. या लक्षणावरून त्या व्यक्तीला डिंगा डिंगा आजार झाल्याचं स्पष्ट होतं. या आजारामुळे चालणंही कठिण होतं. कारण शरीर सातत्याने थरथरत असतं. त्यामुळेच या व्हायरसचं नाव डिंगा डिंगा पडलं. काही प्रकरणात रुग्णांना शरीर आखडणं आणि लकव्यालाही सामोरे जावं लागत आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे या आजाराने अद्याप पर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
आरोग्य अधिकारी काय म्हणत आहेत?
आजाराचं गांभीर्य समजून यूगांडाचे आरोग्य अधिकारी तात्काळ उपचार करत आहेत. बुंडिबुग्यो जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कियिता क्रिस्टोफर म्हणाले की, रुग्णांना साधारणपणे एका आठवड्याच्या उपचारानंतर आराम मिळतो. उपचारादरम्यान अँटीबायोटिक्सचा प्रयोग केला जातो. त्यांनी हर्बल उपचारांवर लक्ष देऊ नका, असं आवाहन केलं आहे. अजूनपर्यंत या आजारावर कोणत्याही हर्बल औषधाचा शोध लागलेला नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.
आजार कसा फैलावतो?
हा आजार पसरू नये म्हणून स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. नवीन रुग्ण आढळल्यास आरोग्य टीमला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या तरी हा व्हायरल बुंडिबुग्यो जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. इतर जिल्ह्यात हा आजार पसरल्याची कोणतीही बातमी नाहीये.
आजार कसा ओळखायचा?
या आजाराचा स्त्रोत अद्याप कळलेला नाही. यूगांडाच्या आरोग्य मंत्रालयाने संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या रक्ताचे नमूने चाचणीसाठी पाठवले आहेत. मात्र, आजाराचं निदान अद्याप झालेलं नाही. हा आजार कशामुळे होतो हे शोधून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतंही सटिक कारण सापडलेलं नाही, असं अधिकार म्हणतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List