मधुमेहाचे रुग्ण असाल आणि जास्त गोड खाल्ले तर करा ‘हा’ व्यायाम, शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

मधुमेहाचे रुग्ण असाल आणि जास्त गोड खाल्ले तर करा ‘हा’ व्यायाम, शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांच्या जीवनशैलीवर वाईट परिणाम होत असतो. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यामध्ये मधुमेह ही समस्या खूप प्रमाणात वाढलेली आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्याच्या आहारात नेहमी पौष्टिक पदार्थाचे सेवन करावे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात मिठाई व गोड पदार्थ खाऊ नये. कारण हे त्याच्या आरोग्यसाठी हानिकारक आहे. पण यात मधुमेहाच्या रुग्णाने चुकून जास्त मिठाई खाल्ली असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यांचे पालन केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. त्यामुळे पुढील आहारात मिठाई खाल्ल्यानंतर सर्वप्रथम आपल्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. यासाठी डाळ, राजमा खा. ते शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. आहारासोबतच व्यायामही करणं गरजेचं आहे.

मिठाई खाल्ल्यानंतर दोन तासांनंतर आणि 4 तासांच्या आत मधुमेहाच्या रुग्णांनी हा व्यायाम केल्यास शरीरातील शुगर लेव्हल वाढणार नाही. कारण व्यायामादरम्यान शरीराला ऊर्जेची गरज असते. यासाठी शरीर रक्तातील ग्लुकोजचा वापर करते. ग्लुकोजच्या वापरामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. अश्यातच दिल्लीतील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील जैन यांनी कोणते व्यायाम करून मधुमेही रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतात याबाबत माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात

ब्रिस्क वॉक फायदेशीर

स्वप्नील जैन सांगतात की, मधुमेहाच्या रुग्णाने जास्त मिठाई खाल्ली असेल तर त्यांनी ब्रिस्क वॉक करावे. कारण ब्रिस्क वॉकमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच मिठाई खाल्ल्यानंतर 4 तासांच्या आत हा व्यायाम करता येतो. ब्रिस्क वॉक केल्याने साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. ब्रिस्क वॉक हा सामान्य चालण्यापेक्षा जरा वेगळं आहे. या ब्रिस्क वॉकिंगमुळे तुम्ही जास्त वेगाने चालू शकत नाही आणि जास्त हळू देखील चालू शकत नाही. तुम्ही अर्धा तास ब्रिस्क वॉक करू शकता.

ब्रिस्क वॉकिंगमुळे हृदयाचे ठोके वाढण्यास आणि रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. यामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळीही नियंत्रणात राहते. वेगवान चालण्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. वेगवान चालण्यासाठी ब्रिस्क वॉकिंग करणे आवश्यक आहे. तुमचे यात लक्ष्य असे असले पाहिजे की प्रति मिनिट 100 ते 135 पावले चालणे असावे.

वॉल सिट

वॉल सिट हा एक असा व्यायाम आहे जो तुम्ही तुमच्या घरातही सहज करू शकता. हे करण्यासाठी, भिंती जवळ उभे रहा आणि खांद्यापर्यंत पाय पसरवा. आता खुर्चीत बसलेल्या स्थितीत थोडावेळ राहा आणि या दरम्यान काही सेकंद श्वास रोखून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर श्वास सोडा. हा व्यायाम केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला तीन पक्ष...
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मंत्री होताच गोगावले हवेत, नेटकऱ्यांचा निशाणा
वंदे भारतच रस्ता चुकली! सीएसएमटी -मडगाव प्रवास मात्र व्हाया कल्याण; वाचा नेमके काय झाले…
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन, 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास